Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिकांच्या नुकसानीचे पंचनामे करा; ढेकूसीम ग्रामस्थांची मागणी

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील ढेकूसीम व अंबासन येथील अतिवृष्टीमुळे नुकसानग्रस्त शेतकऱ्यांचे पिकांचे जागेवर पंचनामे करून नुकसान भरपाई द्यावी अशी मागणीचे निवेदन ढेकूसीम ग्रामपंचायतीच्या वतीने आमदार अनिल भाईदास पाटील यांना देण्यात आले.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, यंदाच्या खरीप हंगामात जून २०२१ पासून ते ऑगस्ट २०१९ पर्यंत अमळनेर मंडळात अत्यल्प पर्जन्यमान झाल्यामुळे शेतकऱ्यांना दुबार व तिबार पेरणी कराव्या लागल्या. या कालावधीत पावसाअभावी पिकांची वाढ न होता वाढ खुंटली. त्यानंतर सप्टेंबरपासून सतत जास्त पावसामुळे पिकांचे नुकसान होऊन ते सडू लागले आहे. कापसाच्या बोंड मधून कोंब निघायला लागले आहे.  बरेचसे नुकसान झाले आहे त्यामुळे शेतकरी अडचणीत आले आहे, अशा परिस्थितीत घटनास्थळी दाखल होऊन पंचनामे करण्यात यावे अश्या मागणीचे निवेदन ढेकूसीम ग्रुप ग्रामपंचायतचे सरपंच, उपसरपंच, ग्रामपंचायत सदस्य आणि शेतकऱ्यांनी दिले आहे.

Exit mobile version