पिंप्री खुर्द येथील कृषी केंद्रांच्या गोदामांची तपासणी

पिंप्री खुर्द, ता. धरणगाव प्रतिनिधी । कृषी विभागाच्या धरणगाव तालुक्याच्या भरारी पथकाकडून पिंप्री खुर्द आणि परिसरात आज अचानक कृषी केंद्राची रासायनिक खताच्या गोडावून ची तपासणी करण्यात आली.

या भरारी पथकामध्ये खरीप हंगाम गुणवत्ता नियंत्रक एस.डी.पाटील, तालुका कृषी अधिकारी अभिनव माळी यांचा समावेश होता. या पथकाने पिंप्री परिसरातील सर्व कृषी केंद्रांची कसून तपासणी केली. या प्रसंगी रासायनिक खतांच्या गोडावूनची कसून तपासणी करण्यात आली. युरियाचा साठा प्रत्येक गोडावून मध्ये जाऊन तपासण्यात आला तसेच कृषी केंद्रामध्ये असलेल्या त्रुटी संदर्भात कृषी केंद्र धारकांना समज देण्यात आली.

या प्रसंगी गुणवत्ता नियंत्रक एस.डी.पाटील यांनी प्रस्तुत प्रतिनिधीशी बोलतांना सांगितले की शेतकरी बांधवांनी आधुनिक शेतीकडे वळले पाहिजे आपल्या पिकांवर येणारे रोग आपण स्वतः ओळखले पाहिजे. आणि त्या नुसारच फवारणी घेतली पाहिजे. तसेच युरिया खताचा मुबलक साठा उपलब्ध असून शेतकर्‍यांनी युरियाच्या विषयी कोणत्याही अफवांना बळी पडून एकाच खताची मागणी करू नये. तसेच युरियाचा कमी वापर करावा तसेच दुकानदारांनी कुठल्याही प्रकारची लिंकिंग करू नये बॅगेवर छापलेल्या किमतीपेक्षा जास्त किमतीत कुठलेही रासायनिक खत विकू नये.

Protected Content