Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळ्यात एकावर चाकूहल्ला

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जळगाव शहरातील पिंप्राळा येथील राम मंदिर परिसरामध्ये, इथे का थांबले आहे, असे म्हटल्याचा राग येवून तिघांनी एकाला मारहाण करून चाकूने वार करून जखमी केल्याची घटना शनिवार, रात्री ९.३० वाजेच्या सुमारास घडली. हा प्रकार एवढयावर न थांबता हल्लेखोरांनी मोबाईल देखील हिसकावून नेला आहे.  याप्रकरणी रामानंदनगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  नीलेश लक्ष्मीनारायण दुबे (४१, रा.पिंप्राळा) असे जखमीचे नाव आहे.

 

नीलेश दुबे हे पिंप्राळा येथे कुटूंबियांसह वास्तव्यास आहे. शनिवारी रात्री ते फुले मार्केट येथे खरेदीला गेले होते. रात्री ९.३० वाजता कुटूंबासह घरी परतल्यावर त्यांना घराच्या बाहेर वाळूच्या ढिगा-यावर तीन अज्ञात तरूण बसलेले दिसून आले. तुम्ही कोण आहात, इथे का थांबले आहे, अशी विचारणा करून नीलेश हे घरामध्ये गेले. तेव्हा तिघांमधील एकाने त्यांना बाहेर बोलवून तू आम्हाला का बोलला असे म्हणत वाद घातला. इतर दोघांनी नीलेश यांना पकडून मारहाण करण्यास सुरूवात केली. तेवढयात एकाने चाकू काढून नीलेश यांच्या पायावर वार करून खिश्यातील १५ हजार रूपये किंमतीचा मोबाईल हिसकावून नेला. दरम्यान, आरडा-ओरड झाल्याने तिघांनी तेथून पळ काढला. लागलीच नीलेश यांच्यासह कुटूंबियांनी पोलिस ठाणे गाठले. पोलिसांनी सांगितल्यानुसार जिल्हा रूग्णालयात प्राथमिक उपचार घेतल्यानंतर नीलेश दुबे यांनी रात्री रामानंदनगर पोलिस ठाण्यात तक्रार दिली असून त्यानुसार तीन जणांविरोधात गुन्हयाची नोंद करण्यात आली.

Exit mobile version