Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळ्यातून वृध्द महिला बेपत्ता; पोलीसात हरविल्याची नोंद

जळगाव प्रतिनिधी । बाहेरून फिरून येते असे सांगून गेलेल्या वृध्द महिला गेल्या दोन महिन्यांपासून बेपत्ता झाल्या आहेत. त्यांचे पती यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे.

बेपत्ता झालेल्या महिलेच्या पतीकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातल्या पिंप्राळा परिसरातील चिंचपूरा गल्ली राहणारे मुरलीधर नारायण कोष्टी (वय-७०) हे आपल्या पत्नी कमलबाई मुरलीधर कोष्टी (वय-६५) सह राहतात. त्यांना एक विवाहित मुलगी आहे. दैनंदिन प्रमाणे त्या कामाकाज करून घरी सायंकाळी ओट्यावर बसल्या. अंदाजे गेल्या दोन महिन्यांपुर्वी कमलबाई ह्या बाहेर फिरून येते असे पती मुरलीधर कोष्टी यांना सांगून घराबाहेर पडल्या होत्या. त्यानंतर त्यांचे पती मुरलीधर कोष्टी आणि मुलगी यांनी इतरत्र शोधाशोध सुरू केली. आजपर्यंत त्या आढळून किंवा मिळून आले नाही. अखेर पती मुरलीधर कोष्टी यांच्या खबरीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात हरविल्याची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोलीस कर्मचारी करीत आहे.

Exit mobile version