Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळा हुडको परिसरात एकावर कोयत्याने वार; चार जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । घरात सांडपाणी आल्याच्या कारणावरून एकाच्या डोक्यात कोयत्याने वार करून जखमी केल्याची घटना पिंप्राळा हुडको येथे घडली. रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

पोलीसांनी दिलेल्या माहितीनुसार, शहरातील पिंप्राळा भागातील ख्वाजा नगर येथील रहिवाशी शाहीम शेख रहिम (वय-३१) हे मजूरी करून आपल्या कुटुंबियांचा उदरनिर्वाह करतात. ९ जून रोजी रात्री ९ वाजता घरी असतांना त्यांच्या मामाच्या घरात सांडपाणी जात असल्याच्या कारणावरून शेजारी राहणारे भुरा शहा, जाबाज शहा, जाकीर शहा, मुन्ना शहा रा. पिंप्राळा हुडको यांना जाब विचारला होता. याचा राग आल्याने भुरा शहा याने शाहीम शेख याच्या डोक्यात कोयता मारल्याने गंभीर दुखापत झाली. शाहीम शेख रहिम यांच्या फिर्यादीवरून रामानंद नगर पोलीस ठाण्यात चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सहाय्यक फौजदार गोपाल चौधरी करीत आहे.

Exit mobile version