Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळा हुडकोत विवाहितेची गळफास घेवून आत्महत्या

जळगाव प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा हुडको येथील २५ वर्षीय विवाहितेने मध्यरात्री घरात गळफास घेवून आत्महत्या केल्याचा प्रकार आज सकाळी उघडकीला आला आहे. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, आनंद श्रावण चौधरी (वय-३२) रा. पिंप्राळ हुडको हे पत्नी सुवर्णा आनंदा चौधरी (वय-३५), आई इंदूबाई चौधरी आणि दोन मुलांसह राहतात. आनंद चौधरी हे व्यवसायाच्या निमित्ताने धुळे येथे कामासाठी गेले होते. घरी पत्नी सुवर्णा आणि आई इंदूबाई होते. मध्यरात्री सुवर्णा चौधरी यांनी सर्वजण झोपले असतांना दोरीने छताला गळफास घेवून आत्महत्या केली. हा प्रकार सकाळी इंदूबाई यांच्या लक्षात आल्याने त्यांनी हंबरडा फोडला. आत्महत्येचे नेमके कारण कळू शकले नाही. याप्रकरणी रामानंदनगर पोलीसांना कळविण्यात आले. पोलीसांनी घटनास्थळी जावून मृतदेहाचा पंचनामा केला. जिल्हा शासकिय महाविद्यालयात शवविच्छेदन करण्यात आले असून मृतदेह नातेवाईकांच्या ताब्यात देण्यात आले आहे. रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास सपोनि संदीप परदेशी, पो.कॉ. सुनिल पाटील, पो.कॉ. रेवानंद साळुंखे करीत आहे.

Exit mobile version