Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळा विकासोवर उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या पॅनलचे वर्चस्व

जळगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील पिंप्राळा येथील विविध कार्यकारी सहकारी सोसायटीवर १३ जागा मधून ९ जागांवर उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या शेतकरी प्रगती पॅनलचा दणदणीत विजयी झाले.

यात सर्वसाधारण मतदार गटातून पॅनल प्रमुख कुलभूषण विरभान पाटील, संजय सखाराम महाजन, दिपक गोपलदास मुंदडा, अनिल भिमसिग पाटील, पांडुरंग उदेसिग पाटील, राहुल राजेंद्र पाटील, पंकज रविंद्र सोमाणी, इतर मागासवर्गीय गटातून जितेंद्र पांडुरंग पाटील, अनुसूचित जाती जमाती गटातून चंद्रकांत उत्तम सोनवणे आदी उमेदवार विजयी झाले.

गेल्या ५२ वर्षांपासून या ठिकाणी निवडणूक झाली नसून शेतकरी मतदार यांनी हुकूमशाहीची परंपरा मोडीत काढून शेतकरी प्रगती पॅनलच्या माध्यमातून प्रस्थापिताची इतक्या वर्षांनी हुकूमशाही मोडीत काढून परिवर्तन घडवून आणले. सदर निवडणूकीत विरोधक यांच्याकडून मोठ्या प्रमाणावर धनशक्तीचा वापर करण्यात आला. मात्र जनशक्तीपुढे याचा टिकाव लागला नाही आणि शेतकरी प्रगती पॅनलच्या ९ उमेदवार भारगोस मतांनी विजयी झाले. यावेळी माजी पोलीस पाटील विष्णू पाटील, जगन्नाथ महाजन, पुरुषोत्तम सोमाणी, धरमसिग पाटील, यशवंत बारी, आनंदा धनगर, भागवत धनगर, दगडू साळवी, राजमल जखेटे, संजय सोमाणी, अमर जैन, ईश्वर राजपूत व गावातील जेष्ठ व श्रेष्ठ यांचे सहकार्य लाभले. निवडणूक अधिकारी म्हणून दीपक पाटील व सहकारी कामकाज पाहिले. पॅनल प्रमुख उपमहापौर कुलभूषण पाटील यांच्या अध्यक्षतेखाली शेतकरी प्रगती पॅनल उभे करण्यात आले होते.

Exit mobile version