Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंप्राळा, अयोध्या नगर, शिवाजीनगरातही बचत गटांना जागा द्या

जळगाव, प्रतिनिधी | सागर पार्क येथे ज्याप्रमाणे महिला बचत गटांना बाजार उपलब्ध करून देण्यात आला याच धर्तीवर शहरातील आयोध्या नगर, शिवाजी नगर, पिंप्राळा येथे देखील त्या परिसरातील महिला बचत गटांना बाजार उपलब्ध करून देण्यात यावा अशी अपेक्षा आ. राजूमामा भोळे यांनी व्यक्त केली. ते महापालिका अंतर्गत नोंदणीकृत गरीब महिला बचत गटांना स्टाॅलसाठी सागर पार्क येथे मोफत जागा उपलब्ध करून देण्यात आली आहे त्याच्या उद्घाटनप्रसंगी बोलत होते.

सागर पार्क येथे दिवाळी सणानिमित्ताने महिला बचत गटांनी तयार केलेल्या साहित्याची विक्री करण्यात येणार आहे. कार्यक्रमाच्या अध्यक्षा महापौर भारती सोनवणे यांनी महिलांनी बचत गटांच्या माध्यमातून स्वावलंबी बनण्याचे आवाहन केले. तर कार्यक्रमाच्या निमंत्रक महिला बालकल्याण समिती सभापती रंजना सपकाळे यांनी मनपाचे अधिकृत ३० बचत गटांच्या स्टाॅलचे नियोजन केले असून आवश्यकता असलेल्यास स्टाॅलची संख्या वाढविण्यात येईल असे स्पष्ट केले. याप्रसंगी नगरसेविका अॅड. शुचित हाडा, गायत्री राणे, सरिता नेरकर, दीपमाला काळे, रंजना वानखेडे, उपायुक्त किरण देशमुख, प्रशांत पाटील, शहर अभियंता अरविंद भोसले, एनएलएमयु व्यवस्थापक गायत्री पाटील, शालिग्राम लहासे, महिला व बालकल्याण अधिकारी पाडुरंग पाटील आदी उपस्थित होते. याश्वितेसाठी आशा चौधरी, कविता जाधव, राजेश गडकर, नितीन जोशी, अब्बास तडवी, मीना मॅडम, लोंढे आदींचे सहकार्य लाभले. प्रास्ताविक नगरसेविका अॅड. शुचित हाडा, सूत्रसंचालन गायत्री पाटील यांनी तर आभार उपायुक्त किरण देशमुख यांनी मानले.

Exit mobile version