Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंपळे बुद्रुक शाळेत शाळा पूर्वतयारी मेळावा

धरणगाव, लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी |  तालुक्यातील पिंपळे बुद्रुक शाळेचे मुख्याध्यापक शशिकांत पानपाटील यांच्या अध्यक्षतेखाली शाळापूर्व तयारी मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यात विविध प्रकारचे स्टॉल उभारून विद्यार्थ्यांना व पालकांना माहिती देण्यात आली.

 

शालेय विद्यार्थी व अंगणवाडीतील विद्यार्थ्यांची सुरुवातीस गावातून प्रभात फेरी काढण्यात आली. शालेय पटांगणात एकूण सात प्रकारचे स्टॉल लावले होते. एक नंबरच्या स्टॉलवर विद्यार्थ्यांचे नाव नोंदणी आणि रिपोर्ट कार्ड देण्याचे नियोजन होते. स्टॉल क्रमांक दोन शारिरीक विकासाबाबत होता. यात दोरीच्या उड्या, चेंडू किंवा रिंग फेकणे, रंग भरणे आदी उपक्रमांचा समावेश होता. स्टॉल क्रमांक तीन बौध्दिक विकासाबाबत होता. यामध्ये लहान मोठा फरक ओळखणे, चित्र लावणे. स्टॉल क्रमांक चारमध्ये सामाजिक आणि भावनात्मक विकासाचा समावेश होता. यात घरी राहिलेल्या मुलांचा शोध घेण्यात आला. स्टॉल क्रमांक पाचवर भाषाविकास चित्र पाहून वर्णन करणे, गोष्ट सांगणे, अक्षरेओळखणे आदींचा समावेश होता. स्टॉल क्रमांक सहावर गणन पूर्व तयारी कमी-जास्त ओळखणे, अंक ओळखणे आदी. कृती घेण्यात आल्या. स्टॉल क्रमांक सातवर मातांना साहित्य देणे व मार्गदर्शन करणे, मुलांना व पालकांना कैलास पवार यांनी मार्गदर्शन केले. तर विविध प्रकारच्या कृती अंगणवाडीच्या शिक्षिका माधुरी पाटील यांनी घेतल्या. कार्यक्रमास केंद्रप्रमुख मनोहर पवार, मुख्याध्यापक शिशिकांत पानपाटील आणि पदवीधर शिक्षक दत्तात्रेय पाटील, गणेश महाजन, अंगणवाडी शिक्षिका माधुरी पाटील, अंजना मालचे, मदतनिस शशिकला पाटील, लिलाबाई श्रीवंत उपस्थित होते. सूत्रसंचालन कैलास पवार यांनी केले.

Exit mobile version