Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पिंगळवाडे येथील विद्यार्थ्याची आकाशवाणी कार्यक्रमासाठी निवड!

अमळनेर, प्रतिनिधी | तालुक्यातील पिंगळवाडे येथील विद्यार्थ्यी सर्वज्ञ रविंद्र देशमुख याची नागपूर आकाशवाणी केंद्रावरुन प्रसारित होणाऱ्या ‘शाळा बाहेरची शाळा’ या कार्यक्रमासाठी निवड झाली असून तो जिल्हा परिषद शाळेतून एकमेव विद्यार्थी आहे.

ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांना आपले छंद जोपासता यावे म्हणून नागपूर येथील प्रादेशिक विद्या प्राधिकरण व प्रथम फाऊंडेशन यांच्या संयुक्त विद्यमाने राज्यस्तरीय सदर उपक्रमाला सुरुवात करण्यात आली आहे. याच धर्तीवर जिल्हा परिषद जळगावच्या वतीने जिल्हास्तरीय हा उपक्रम राबविला जात आहे. दरम्यान पिंगळवाडे येथील जिल्हा परिषदेच्या शाळेत इयत्ता चौथीच्या वर्गात शिकत असलेला सर्वज्ञ देशमुख याची या कार्यक्रमासाठी निवड झाली असून शालेय अभ्यासाच्या विशिष्ट टास्क बद्दल माहिती देण्यासाठी त्याची निवड झाली आहे. तत्पूर्वी सर्वज्ञशी संवाद साधण्यापुर्वी ‘कोविड काळातील मुलांचा अभ्यास’ याबाबत पालक रविद्र देशमुख यांनी मुक्त संवाद साधला. ‘महाराष्ट्रात बोलल्या जाणाऱ्या विविध बोलीभाषा’ या विषयावर विचारलेल्या प्रश्नांची सर्वज्ञने मोकळेपणाने उत्तरे दिल्यामुळे त्याची निवड करण्यात आली आहे. गटशिक्षणाधिकारी आर.डी.महाजन यांच्या प्रोत्साहनामुळे पिंगळवाडे शाळेला हा बहुमान मिळाल्याचे तंत्रस्नेही शिक्षक तथा शाळेचे मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे यांनी सांगितले. सर्वज्ञला यासाठी अमळगाव बीटचे शिक्षण विस्तार अधिकारी पी.डी.धनगर साहेब, अमळगाव केंद्राचे केंद्रप्रमुख चंद्रकांत साळुंके, मुख्याध्यापक दत्तात्रय सोनवणे, शाळेतील शिक्षक प्रविण पाटील, रविंद्र पाटील व वंदना सोनवणे यांचे प्रमुख मार्गदर्शन लाभले. सर्वज्ञ याच्या आई-वडीलांचे कौतुक जि.प.चे मुख्य कार्यकारी अधिकारी डॉ.पंकज आशिया , प्राथ.शिक्षणाधिकारी विकास पाटील, गटशिक्षणाधिकारी राजेंद्र महाजन, पिंगळवाडे ग्रामपंचायतीच्या सरपंच मंगला देशमुख, उपसरपंच अतुल पाटील, शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्षा कल्पना पारधी, उपाध्यक्ष समाधान पाटील व ग्रामस्थांनी केले आहे. तसेच मुलाखतीसाठी प्रथम फाऊंडेशनचे जिल्हा समन्वयक विकास निकुंभे यांचेही मार्गदर्शन सर्वज्ञला लाभले. सर्वज्ञाचे या कार्यक्रमाच्या २११ व्या भागासाठी निवड झाली असून सदर कार्यक्रम हे गुरुवार २१ ऑक्टोबर रोजी सकाळी १०:३० वाजता प्रसारित होणार आहे. यामुळे विद्यार्थी, पालक व शिक्षकांनी हा कार्यक्रमाचा ऐकावे असे आवाहन करण्यात आले आहे.

Exit mobile version