Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पावणे ४ लाखांचा ऐवज लांबविणाऱ्या चोरट्यांना पोलीसांनी केले जेरबंद!

*चाळीसगाव- लाईव्ह ट्रेंड्स न्युज प्रतिनिधी* | तालुक्यातील मुंदखेड येथील एकाच्या घरातून पावणे चार लाखांचा ऐवज अज्ञाताने चोरून नेल्याची घटना घडली होती. याप्रकरणी ग्रामीण पोलिसांनी सापळा रचून आरोपींना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून दोन लाखांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे.

याबाबत वृत्त असे की, चाळीसगाव तालुक्यातील मुंदखेड ब्रु. येथील रामदास धना पाटील (वय-८२) यांचे राहत्या घरातून अज्ञात इसमाने सोन्याच्या दागिन्यांसह रोकड असे एकूण ३ लाख ८७ हजार रुपयांचे ऐवज चोरून नेल्याची घटना १४ जानेवारी २०२२ रोजी रात्री ९ ते १५ जानेवारी रोजी सकाळी ६ वाजे दरम्यान घडली होती. याप्रकरणी रामदास धना पाटील यांच्या फिर्यादीवरून चाळीसगाव ग्रामीण पोलीस स्थानकात भादवी कलम- ४५४, ३८० प्रमाणे गुन्हा दाखल करण्यात आले होते. याचा तपास पोउनि लोकेश पवार हे करीत होते. दरम्यान ग्रामीण पोलीस स्थानकाचे पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांना वरील घटनेतील चोरट्यांबाबत गुप्तहेरांकडून माहिती मिळाली. त्यावर त्यांनी लागलीच पथक तयार करून सापळा रचला. व आरोपीला ताब्यात घेतले. योगेश राजेंद्र कुमावत, (वय २५), छायाबाई ऊर्फ वर्षा नारायण पाटील, (वय-३३) दोन्ही रा.मुंदखेडे ता.चाळीसगाव अशी त्यांची नावे असून त्यांच्याकडून पोलिसांनी १ लाख रोखड व ४० हजार रूपये असे एकूण २ लाख २२ हजार वीस रूपयांचा मुद्देमाल हस्तगत करण्यात आले आहे. याबाबत ग्रामीण पोलीसांचे सर्व स्तरातून कौतुक होत आहे.

सदर कारवाई पोलीस अधीक्षक डॉ. प्रविण मुंढे, अपर पोलीस अधीक्षक रमेश चोपडे, उपविभागीय पोलीस अधिकारी कैलास गावडे, पोलीस निरीक्षक संजय ठेंगे, यांचे मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक लोकेश पवार, सफौ/ राजेंद्र साळुंखे, पोहेकॉ/ नितीन सोनवणे, मपोना/ मालती बच्छाव, पोना / शंकर जंजाळे, पोना/ संदिप माने, पोना/ मनोज पाटील, पोना/ भूपेश वंजारी, पोना/ गोवर्धन राजेंद्र बोरसे, पोना/ शांताराम सिताराम पवार, पोना/ प्रेमसिंग राठोड या पथकाने केली आहे. पुढील तपास पोलीस निरीक्षक संजय ठेंगे यांचे मार्गदर्शनाखाली पोउनि लोकेश पवार व पोना/ भूपेश वंजारी हे करीत आहेत. तत्पूर्वी आपण बाहेर गावी जात असताना आपल्याकडील सोन्याच्या दागिन्यांसह रोकड घरात न ठेवता एकद्या बॅंकेच्या लॉकरमध्ये ठेवावेत असे आवाहन पोलिस निरीक्षक संजय ठेंगे यांनी केले आहे.

Exit mobile version