Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळसदल येथील शास्त्री इन्स्टिट्यूट ऑफ फार्मसीत शिपाईच्या हस्ते ध्वजारोहण

एरंडोल प्रतिनिधी । तालुक्यातील पळासदल येथील शास्त्री इन्स्टिटयूट ऑफ फार्मसी तर्फे एक अदभूत उपक्रम राबविण्यात आला. कोरोना कालावधीत न डगमगता महाविद्यालयातील रात्रं दिवस सेवा देणारे वॉचमन अस्मान संदानशिव यांच्याहस्ते प्रजासत्ताकदिनी ध्वजारोहण करण्याचा मान देण्यात आला.

दिलेल्या अविरत सेवे बद्दल संस्थेचे अध्यक्ष डॉ विजय शास्त्री व सचिव रूपा शास्त्री यांनी त्यांचा सत्कार केला. २६ जानेवारीचा कार्यक्रम कोरोना बाबत जागृतीची जाण ठेवून सोशियल डीस्टस ठेऊन व मास्क वापरून करण्यात आला. संस्थेच्या ध्वजा रोहन कार्यक्रमास अध्यक्ष डॉ. विजय शास्त्री व सचिव रूपा शास्त्री यांची उपस्थिती लाभली. डॉ. विजय शास्त्री यांनी कोरोना काळात संस्थेचे कर्मचारी वर्गाला वेळोवेळी केलेले मार्गदर्शनामुळे संस्थेत एकही कर्मचारी वर्ग कोरोना ग्रस्त झाला नाही त्या बद्दल आभार मानले.

विविध औषधी वनस्पती लावून वृक्षारोपणाचा कार्यक्रम सुद्धा यावेळी राबविण्यात आला . यावेळी संस्थेचे कर्मचारी उपप्राचार्य गोपीचंद भोई, विभाग भाग्यश्री, प्रमुख प्रा . जावेद शेख , प्रा. राहुल बोरसे , प्रा. महेश पाटील, जागृती पाटील, नेरपगार उपस्थित होते. तसेच ग्रंथपाल सरिता भोई, कार्यालयीन प्रमुख दिवाकर पाटील , जनसंपर्क अधिकारी शेखर बुंदेले व इतर शिक्षकेतर कर्मचारी वर्ग उपस्थित होता.

Exit mobile version