Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधी येथे विवाहितेचा विनयभंग; जाब विचारणार्‍या पतीस फायटरने मारहाण

पहूर. ता.जामनेर प्रतिनिधी । येथून जवळच असलेल्या पाळधी येथे आज एका विवाहितेचा विनयभंग करुन याबाबत जाब विचारण्यासाठी गेलेल्या पतीस फायटरने मारहाण करून जखमी केल्याची घटना घडली. याप्रकरणी चार जणांविरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

याप्रकरणी एका व्यक्तीने पहुर पोलिस ठाण्यात फिर्याद दिली की, पाळधी येथील अजय देविदास सौदागर याने माझ्या पत्नी चा हात धरून छेड काढून विनयभंग केला. ही बाब आरोपी च्या वडिलांना सांगण्यासाठी घरी गेलो असता याचा राग येवून अजय सौदागर,देविदास भिका सौदागर,अक्षय देविदास सौदागर, विशाल रामदास बाविस्कर यांनी फायटरने मारुन जखमी केले. तसेच माझा भाऊ सोडविण्यासाठी आला असता त्यासही मारहाण केली. म्हणून वरील सर्व आरोपींविरुद्ध पहुर पोलिस ठाण्यात गु.र.नं.१५२/२०२०भा.द.वि.कलम ३२४,३५४अ,५०४,५०६,३४प्रमाणे दाखल करण्यात आला आहे. तपास पो.हे.काँ.शशिकांत पाटील हे करीत आहेत.

Exit mobile version