Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधी येथील कामगाराचा ग्लानी येवून पडल्याने अकस्मात मृत्यू

जळगाव प्रतिनिधी । पाईप कंपनीत काम करणाऱ्या तरूणाला ग्लानी येवून खाली पडल्याने अकस्मात मृत्यू झाल्याची घटना धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील एका कंपनीत आज सकाळी ५ वाजेच्या सुमारास घडली. याप्रकरणी रामानंद नगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.

अधिक माहिती अशी की, धरणगाव तालुक्यातील पाळधी येथील अभिषेक अग्रवाल यांचे तिरूपती पाईप ॲण्ड अलाईड इंडस्ट्रीज नावाची कंपनी आहे. तेथे परप्रांतिय गेल्या दोन वर्षांपासून कामाला आहे. रात्री पाळीला असला असलेला कामगार हरीषचंद्र जोखलाल यादव (वय-३५) रा. चाकीया, ता. बहालपूर जि. इलाहाबाद (बिहार) ह.मु. पाळधी ता. धरणगाव हा गेल्या दोन ते अडीच वर्षांपासून कंपनी हॅमर हेल्पर म्हणून कामाला होता. रविवारी रात्री त्याची रात्रपाळी असल्याने तो कामाला आला होता. सोमवारी ७ डिसेंबर रोजी पहाटे ५ वाजता त्याला अचानक ग्लानी आल्याने तो खाली जमिनीवर पडला. यात त्याला डोक्याला जबर मार बसल्याने जागीच मृत्यू झाला आहे. सोबत असलेल्या कामगारांनी तातडीने जिल्हा वैद्यकिय महाविद्यालयात दाखल केले असता वैद्यकिय अधिकारी यांनी मृत घोषीत केले. घटनेबाबत रामानंदनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे. पुढील तपास पोहेकॉ पठाण करीत आहे.

Exit mobile version