Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधीत होणार संजय राऊतांची सभा : नियोजनासाठी निलेश चौधरींनी घेतली भेट

धरणगाव-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षाची बुलंद तोफ खासदार संजय राऊत यांची सभा पाळधी येथे होणार असून याच्या नियोजनासाठी माजी नगराध्यक्ष तथा युवासेना जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी त्यांची नाशिक येथे भेट घेतली.

धरणगाव येथील महाप्रबोधन यात्रेला जोरदार प्रतिसाद लाभल्यानंतर थेट पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांचे गाव आणि त्यांचा बालेकिल्ला मानल्या जाणार्‍या पाळधी गावात खासदार संजय राऊत यांनी सभा घेण्याची घोषणा केली आहे. प्रसारमाध्यमांशी बोलतांना त्यांनी याबाबत विवेचन केले आहे. या अनुषंगाने पाळधी येथील सभेची जय्यत तयारी शिवसेना-उध्दव बाळासाहेब ठाकरे पक्षातर्फे करण्यात येत आहे.

दरम्यान, पाळधी येथील सभेच्या नियोजनासाठी माजी नगराध्यक्ष तथा युवासेनेचे जिल्हाप्रमुख निलेश चौधरी यांनी खासदार संजय राऊत यांची नाशिक येथे भेट घेतली. याप्रसंगी त्यांच्यासोबत पक्षाचे उपजिल्हा प्रमुख शरद माळी यांची देखील उपस्थिती होती. या बैठकीत खासदार राऊत यांची सभेच्या नियोजनासह स्थानिक बाबींची माहिती जाणून घेतली. या संदर्भात निलेश चौधरी म्हणाले की, महाप्रबोधन यात्रेप्रमाणेच पाळधी येथील सभा देखील भव्य-दिव्य स्वरूपात पार पडणार असून आम्ही याचे काटेकोर नियोजन करत आहोत.

Exit mobile version