Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाळधीजवळ ट्रक कलंडला; क्लिनर किरकोळ जखमी

जळगाव प्रतिनिधी । जळगाव एमआयडीसीतून पालघर येथे पशूखाद्याच्या गोण्या घेवून जाणारा ट्रालाच्या दोन चाके निखळल्याने आज सकाळी अपघात झाला. क्लिनर किरकोळ जखमी झाला आहे. या अपघातात ट्रकचे मोठ्या प्रमाणावर नुकसान झाले.

याबाबत माहिती अशी की, जळगाव एमआयडीसीतून पशूखाद्याच्या पोते भरून पालघर येथे निघालेला ट्रला क्रमांक (एमएच १९ झेड ४२७८) पाळधी येथील जैन कंपनीजवळ ट्रलाचे उजव्या बाजूचे दोन चाके निखळल्याने ट्रालाचा तोल जावून कलंडला. यात सर्व गोण्या महामार्गावर सुमारे दीडतास पडून होते. सुदैवाने चालक व क्लिनर सुखरूप आहे. यात क्लिनरला किरकोळ दुखापत झाली आहे. दरम्यान कंपनीकडून दुसरा ट्रक मागविण्यात आला त्यात सर्व गोण्या भरण्यात येत आहे. महामार्गावार पडलेल्या ट्रालाला क्रेनच्या सहाय्याने बाजूला केले. लॉकडाऊनमुळे वाहतूक कमी असल्याने क्रेनच्या मदतीने रस्ता मोकळा करण्यात आला. याप्रकरणी अद्यापपर्यंत पोलीसात कोणतीही नोंद करण्यात आलेली नाही.

Exit mobile version