पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील याच्या वाढदिवसानिमित्त पाळधी येथे विविध सामाजिक उपक्रम

धरणगाव-लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | तालुक्यातील पाळधी येथे पाणीपुरवठा व स्वच्छता मंत्री तथा जळगाव जिल्हा पालकमंत्री ना. गुलाबराव पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व डॉ. श्रीकांत शिंदे फाउंडेशनच्या वतीने मोफत भव्य आरोग्य व रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते.

 

जि.प कन्या शाळा पाळधी येथे ना. गुलाबराव पाटील यांच्या हस्ते छत्रपती शिवाजी महाराज, वंदनीय हिंदूह्रदयसम्राट बाळासाहेब ठाकरे, धर्मवीर आनंद दिघे साहेब, यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून आरोग्य शिबीराचे उद्घाटन करण्यात आले. याप्रसंगी वंदनीय बाळासाहेब ठाकरे शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा संपर्क समन्वयक जितेंद्र गवळी, जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे, भावेश ढाके, महानगर समन्वयक दीपक घ्यार, सह-समन्वयक गणेश गुरव, विशाल परदेशी, दीपक पाटील, अनिल पवार, राहुल पाटील, रोशन ठाकरे, सागर सोनवणे, राजेंद्र सपकाळे, ज्ञानेश्वर सोनवणे, विशाल निकम, जिल्ह्यातील विविध तालुक्यातील आरोग्यसेवक, समन्वयक व शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष जळगाव जिल्हा संपुर्ण टिम उपस्थित होती.
ना. गुलाबराव पाटील यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचे जळगाव जिल्हा समन्वयक डॉ. मोईज देशपांडे व त्यांची टिम शिवसेना वैद्यकीय मदत कक्षा मार्फत जिल्ह्यात विविध ठिकाणी रक्तदान शिबीर, महा आरोग्य शिबीर, रूग्णांना सर्वतोपरी मदत केली आह. ना. गुलाबराव पाटील यांनी वैद्यकीय मदत कक्ष जळगाव टिमचे व डॉ. मोईज देशपांडे यांच्या कार्याची शिबीरास्थळी प्रशंसा केली. या शिबीरात तज्ञ डॉक्टरांकडून नागरिकांची मोफत ह्रदयरोग तपासणी, 2 डि ईको, ई.सी.जी तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले, आवश्यकते नुसार एन्जिओग्राफी, एन्जिओप्लास्टी, पेसमेकर, रिनल एन्जिओप्लास्टी, आय.व्ही.सी फिल्टर, बायपास. तसेच नेत्ररोग शस्त्रक्रिया, तिरळेपणा शस्त्रक्रिया आदीं रोगांची तपासणी व मार्गदर्शन करण्यात आले. तसेच उन्हाळ्यात रक्ताचा मोठ्या प्रमाणात तुटवडा जाणवू लागल्याने वैद्यकीय कक्षाच्या वतीने रक्तदान शिबीराचे आयोजन करण्यात आले होते. आयोजित केलेल्या भव्य रक्तदान शिबीराला पाळधी येथे उत्तम प्रतिसाद मिळाला यात नागरिकांनी तसेच शिक्षक वृंद, पोलीस, पंचायत समिती कर्मचारी यांनीही पालकमंत्री ना. गुलाबरावजी पाटील साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त रक्तदान करून सामाजिक बांधिलकी जपली. रक्तदात्यांनी शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या कार्याचे कौतुक केले.
ना. गुलाबरावजी पाटील यांच्या वाढदिवसानिमित्त शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाच्या वतीने घेण्यात आलेल्या शिबीरामुळे अनेक गरिब व गरजू रुग्णांना मोफत शिबिराचा लाभ मिळाला व आवश्यकतेनुसार अनेक रुग्णांचे खर्चीक शस्त्रक्रिया या शिबिरातून मोफत करण्यात येणार आहे. तसेच शिवसेना वैद्यकीय मदत कक्षाचा ना. गुलाबरावजी पाटील यांच्या उपस्थितीत चोपडा तालुक्यात विस्तार करण्यात आला असून चोपडा तालुका समन्वयकपदी जयेश सोनवणे यांची नियुक्ती करण्यात आली. चोपडा तालुक्यातील आरोग्यसेवकांच्या नियुक्त्या पालकमंत्री यांच्या हस्ते करण्यात आल्या. वाढदिवसाचे अवचित्त साधत शिवसेना वैद्यकीय मदत कक्ष व जि.प कन्या शाळा पाळधी यांच्या वतीने वृक्षारोपण करण्यात आले.

Protected Content