Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात रुग्णसाहित्य केंद्राचे उद्घाटन; गोरगरिबांना मिळणार आधार

पारोळा लाईव्ह ट्रेंडस न्युज प्रतिनिधी । शहरातील मोठे श्रीराम मंदिराच्या आवारात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समिती अंतर्गत रुग्णसाहित्य सेवा केंद्राचे उद्घाटन नुकतेच करण्यात आले. या केंद्राचा गोरगरिबांना आधार मिळणार आहे.

 

राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जनकल्याण समितीच्या माध्यमातून १९७२ पासून रुग्णसेवेचे कार्य सुरू आहे. रुग्णसेवा ही काळाची गरज आहे. गोरगरिबांना दुर्धर आजाराने ग्रासले तर उपचारासाठी त्यांच्याकडे पैसा नसल्याने छोटा स्वरूपाचा आजार बळावतो. या आणि अशा गोरगरीब रुग्णासाठी जनकल्याण समितीच्या माध्यमातून रुग्ण साहित्य उपलब्ध करण्यात आल्याने गोरगरिबांना आधार मिळणार असल्याचे जनकल्याण समितीचे जिल्हाकार्यवाह विनोद कोळी यांनी सांगितले. रुग्ण साहित्याच्या माध्यमातून गोरगरीब रुग्णाची सेवा घडणार आहे. या साहित्यामध्ये आणखी भर घालण्यासाठी दात्यांनी पुढे येण्याचे आवाहन डॉ. संभाजीराजे पाटील यांनी केले. यावेळी संघचालक मुकेश चोरडिया, तालुका कार्यवाह आकाश बडगुजर, सहकार्यवाह प्रितेश जैन, डॉ. सुमित हलगे, डॉ. चेतन बडगुजर, डॉ. सुदर्शन जैन, उद्योजक गोपाल अग्रवाल, प्रेरणा इन्स्टिट्यूटचे संचालक धीरज महाजन, श्रीकांत पाठक, डॉ. भूषण चव्हाण, डॉ. निलेश चोरडिया, डॉ. चेतन नाईक, अॅड. हेमंत सोनवणे, मनन संस्थेचे अध्यक्ष विशाल महाजन, अभिषेक फंड, नयन चौधरी, भावेश पाटील, राहुल महाजन, स्वप्नील महाजन, मयूर महाजन उपस्थित होते.

Exit mobile version