Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यात पालघर घटनेच्या निषेधार्थ तहसीलदारांना निवेदन

पारोळा, प्रतिनिधी । महंत स्वामी कल्पवृक्षगिरी व स्वामी सुशील गिरी या संतांची व त्यांच्या वहान चालकाची पालघर जिल्हयात गडचिंचले या गावाजवळ जमावाकडून १६ तारखेला निघृण हत्या करण्यात आली. या घटनेचा विश्व हिंदू परिषद, बजरंग दलातर्फे तहसीलदारांना निवेदन देऊन तीव्र निषेध करण्यात आला. .

निवेदनाचा आशय असा, देशात लॉकडाऊन लागू असतांना जमाव कसा एकत्र येऊ शकतो असा प्रश्न उपस्थित करत महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व गृहमंत्री यांनी याबाबत स्पष्टीकरण द्यावे अशी मागणी करण्यात आली आहे. महाराष्ट्र संतांची भूमी म्हणून प्रसिद्ध असतांना या भूमीत संतांची हत्या होणे हे सरकारचे अपयश असल्याचा आरोप करण्यात आला आहे. स्वत:ला पुरोगामी व प्रगतीशील समजणाऱ्या शासनाच्या काळात महाराष्ट्रात अशी घटना झाली हे अत्यंत दुर्दैवी आहे.

पालघर हत्या प्रकरणाला धार्मिक रंग देऊन भडकवू नये – मुख्यमंत्री उद्धव ठाकरे

या घटनेत तिसऱ्या शक्तीचा हात आहे का हे तपासले पाहिजे. इतक्या निघृण हत्येच्या घटनेबाबत मानवी हक्क संघटनेचे व लिबर्टी फॉर फ्रीडम चे कार्यकर्ते काहीच बोलत नाहीत हे आश्चर्य आहे. ही सर्व घटना महाराष्ट्राच्या कर्तव्यदक्ष गृहमंत्र्यांच्या पोलिसांसमोर घडली. याचे उत्तर जनता मागत आहे. अशा प्रकारे अमानवीय पद्धतीने हत्या करणाऱ्यांचा आम्ही पुन्हा निषेध करतो व संत समाजाबद्दल महाराष्ट्रात असुरक्षिततेचे वातावरण निर्माण होणार नाही याची दक्षता शासनाने घ्यावी अशी अपेक्षा व्यक्त करतो असे निवेदनामध्ये म्हटले आहे. पारोळाचे तहसीलदार अनिल गोविंद यांना निवेदन दिले. निवेदन देताना सर्व नियमांचे पालन करून निवेदन दिले यावेळी बजरंग दलाचे व विश्व हिंदू परिषदेचे प्रखंड सयोजक अंकुश सचिन गुजराती शहर सयोजक केतन वसंत पाटील, तालुका सुरक्षा गोरख देवाजी चौधरी, जिल्हा सहगोरक्षक प्रमुख नितिन भास्कर बारी उपस्थित होते.

पालघर येथे जमावाकडून तिघांची हत्या; योगी अदित्यनाथ यांचा मुख्यमंत्री ठाकरेंना फोन

Exit mobile version