Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्यातील घरपट्टीच्या प्रक्रियेला स्थगिती : परिपत्रक जारी

पारोळा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी | नवीन नगराध्यक्ष व नगरसेवकांच्या नियुक्तीपर्यंत येथील नगरपालिकेच्या घरपट्टी प्रक्रियेला स्थगिती देण्यात आली असून याबाबत शासनाचे परिपत्रक जारी करण्यात आले आहे.

 

या संदर्भातील वृत्त असे की, पारोळा नगरपालिकेच्या सन २२-२३  ते २५-२६ या वर्षासाठीची घरपट्टी आकारणी प्रक्रिया सुरू होती. यातील अन्यायकारक तरतुदींमुळे याला विरोध करण्यात आला होता. या संदर्भात आमदार चिमणराव पाटील यांना निवेदन देखील देण्यात आले होते. त्यांनी या संदर्भात नगरविकास खात्याकडे पाठपुरावा केला होता. याचीच दखल घेण्यात आली आहे.

 

राज्याच्या नगरविकास खात्याने परिपत्रक जारी करत पारोळा नगरपालिकेची २२-२३ ते २५-२६ या वर्षांसाठीच्या घरपट्टी आकारणी प्रक्रियेला स्थगीती देण्यात येत असल्याचे नमूद केले आहे. नवीन नगरसेवक आणि नगराध्यक्षांची नियुक्ती होईपर्यंत ही स्थगीती असेल असे या परिपत्रकात नमूद करण्यात आले आहे.

Exit mobile version