Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळ्याच्या बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणी

पारोळा प्रतिनिधी । तालुक्यात अद्याप एकही कोरोना पॉझिटीव्ह रूग्ण आढळला नसला तरी याचा संसर्ग रोखण्यासाठी शहरातील बाजारपेठेत वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणी करण्यात येत आहे.

याबाबत वृत्त असे की, पारोळा तालुक्यात एकही रूग्ण नसला तरी शासन, प्रशासनाने जे नियम अटी घातल्या त्याचे आज पर्यंत काटेकोरपणे पालन करण्यात आले पण दिनांक १८ मे पासून चौथ्या चरणातील लॉकडाऊमध्ये जनजीवन सुरळीत होऊन काही भागात उद्योग व्यवसाय सुरू करण्यात आले असले तरी त्याला नियम व अटी घालण्यात आलेल्या असतांना मात्र आज जळगांव जिल्ह्यात सर्व तालुक्यात रूग्ण असतांना एरंडोल व पारोळा तालुक्यात एकही रूग्ण नाही. या तालुक्यांना चारही बाजूंनी वेढलेले असतांना आज पारोळा शहरात नवरात्रात ज्याप्रमाणे बालाजी महाराजाची यात्रा भरते त्या प्रमाणे आज बाजारात गर्दीचे चित्र दिसत होते

तरी कोरोना संसर्ग हा गंभीर असुन जनता मात्र गांभिर्याने घेत नसुन मास्क न लावता लोक फिरत आहेत. तसेच वाहनांमुळे बाजारपेठेत गर्दी होत असल्याने वाहनांना बाजार पेठेत प्रवेश बंद करण्यात यावा अशी मागणी शहरवासिंयासह जनतेतुन होत आहे तरी कोरोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी पारोळ्यात वाहनांना प्रवेश बंद करण्याची मागणी दर्पण समुह अध्यक्ष विजय नावरकर यांनी देखील केली आहे.

Exit mobile version