Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना घरी जाण्याची आ.चिमणराव पाटीलांचा शासनाकडे पत्रव्यवहार

पारोळा प्रतिनिधी । कोरोनाच्या लॉकडाऊनमुळे काही विद्यार्थी व नागरिक इतर जिल्ह्यात अडकून पडले आहेत. लॉकडाऊनमध्ये अडकलेल्यांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागत आहे. अशांना आपल्या जिल्ह्यात व तालुक्यात आणण्यासाठी आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाला पत्रव्यवहार करून पाठपुरावा सुरू ठेवला आहे.

एरंडोल व पारोळा तालुक्यातील विद्यार्थी व नागरीक असे जवळपास १२५ ते १५० जण विविध ठिकाणी शिक्षण व रोजगाराच्या निमित्ताने परजिल्ह्यात आणि परराज्यात गेले होते. कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी देशात १७ मे पर्यंत लॉकडाऊनची घोषणा करण्यात आली आहे. त्यामुळे तालुक्यातील अनेक जण संबंधीत गावांमध्ये अडकून पडले आहे. त्यांची मोठ्याप्रमाणावर हाल होत आहे. अडकून पडलेल्या नागरीकांना गावाकडे परतण्यासाठी शासनपातळीवर व्यवस्था व्हावी, असा पत्रव्यवहार आमदार चिमणराव पाटील यांनी शासनाकडे केला आहे.

दरम्यान, तालुक्यातील जोगलखेडे येथे एका पोलीसाला कोरोना पॉझिटीव्ह आल्याने गावातील नागरीकांमध्ये संभ्रम निर्माण झाला आहे. यासाठी खबरदारी म्हणून उपाययोजना व जनता कर्फ्यू पाळण्यासाठी त्यांनी थेट फेसबुक’च्या माध्यमातून संवाद साधत नागरिकांना सूचना आवाहन केले आहे. तसेच संबंधित सर्व प्रकरणासंदर्भात अधिकाऱ्यांना आमदार चिमणराव पाटील यांनी सूचना केला असून शासनाचे सूचना सर्व नागरिकांनी पालन करावे असेही आहवान केले आहे.

Exit mobile version