पारोळा शेतकरी संघ : अरूण पाटील यांची चेअरमनपदी बिनविरोध निवाड

 

पारोळा प्रतिनिधी । शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदासाठीच्या निवडणूकीत शिवसनेचे अनुक्रमे अरूण दामु पाटील व सखाराम श्रावण चौधरी यांचा एकमेव आर्ज प्राप्त झाल्याने निवडणूक अधिकारी श्रीमती सिंहाले यांनी त्यांची बिनविरोध निवड घोषित केली.

शेतकरी सहकारी संघाच्या चेअरमन व व्हा. चेअरमन पदाचा निवडणुक कार्यक्रम निवडणुक अधिकारी श्रीमती सिंहाले यांच्या उपस्थित पार पडला. या निवडणुकीत चेअरमन पदासाठी शिवसेनेचे अरूण दामु पाटील व व्हा. चेअरमन पदासाठी शिवसेनेचे सखाराम श्रावण चौधरी यांचा एकमेव अर्ज प्राप्त झाल्यामुळे निवडणुक अधिकारी श्रीमती सिंहाले यांनी चेअरमनपदी अरूण दामु पाटील व व्हा.चेअरमनपदी सखाराम श्रावण चौधरी यांची बिनविरोध निवड झाल्याचे जाहीर केले.
याप्रसंगी आमदार चिमणराव पाटील उपस्थितांना मार्गदर्शन केले. आमदार पाटील यांनी अश्या निष्टावंत कार्यकर्त्यांना न्याय देते वेळी खुप आनंद होतो, आपणास मिळालेल्या पदाचा दुरूपयोग न करता जास्तीत जास्त शेतकऱ्यांचा फायदा कसा करता येईल, संघटन कसे मजबुत करता येईल याकडे लक्ष केंद्रीत करा. शेतकी संघाच्या मका, ज्वारी, बाजरी खरेदीचा जास्तीत जास्त शेतकऱ्यांना लाभ कसा मिळवुन देता येईल यासाठी सदैव कटीबद्ध राहा असे आवाहन केले.

यावेळी दोनही नवनिर्वाचित चेअरमन व व्हा. चेअरमनपदी निवड झालेल्यांचा सत्कार आमदार चिमणराव पाटील यांच्या हस्ते करण्यात आला. यावेळी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगांव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील, बाजार समितीचे संचालक चतुर पाटील, जिजाबराव पाटील, शेतकी संघाचे मा.चेअरमन.पोपटराव चव्हाण, डाॕ.राजेंद्र पाटील, मा.व्हा. चेअरमन.भिकन महाजन, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा. आर. बी. पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, पारोळा शेतकी संघ संचालक सुधाकर पाटील, शरद पाटील, चेतन पाटील, आधार पाटील, गणेश पाटील, दिपक पाटील, सुभाष संदानशिव, राजु पाटील, हिम्मत पाटील, नथ्थु पाटील, पारोळा बाजार समितीचे संचालक विजय पाटील, मधुकर पाटील, प्रा. बी. एन. पाटील, प्रेमानंद पाटील, युवासेना उपतालुकाप्रमुख समाधान मगर, शेतकी संघ संचालक, कर्मचारी, सर्व कृषि उत्पन्न बाजार समितीचे संचालक, तसेच आदी उपस्थित होते.

Protected Content