Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा येथील राम मंदीरातील दानपेटी चोरट्यांनी फोडली

पारोळा प्रतिनिधी ।  शहरातील राममंदीर येथील दानपेटी फोडून सुमारे ५ हजार ८०० रूपयांची रोकड अज्ञात चोरट्यांनी चोरून नेल्याचा प्रकार उघडकीला आला आहे. याप्रकरणी पुजारी यांच्या फिर्यादीवरून पारोळा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, शहरातील मोठे राम मंदीरात गेल्या अनेक वर्षांपासून हरीनारायण संतोष मित्रा (वय-३०) रा. ओबारा ता. सिमरीय जि. रिवा (मध्यप्रदेश) हे पुजारी म्हणून काम करतात. रोज नित्यनेमनुसार त्यांनी २६ फेब्रुवारी रोजी रात्री ८ वाजता मंदीर बंद करून झोपले. अज्ञात चोरट्यांनी मध्यरात्री दानपेटी फोडून पेटीत असलेले ५ हजार ८०० रूपयांची चिल्लर चोरून नेल्याचे २७ फेब्रुवारी रोजी सकाळी उघडकीला आले. याप्रकरणी हरीनारायण मित्रा यांच्या फिर्यादीवरून अज्ञात चोरट्यांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक प्रविण पाटील करीत आहे.

Exit mobile version