Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारोळा बाजार समिती उपाध्यक्षपदी दगडू पाटील यांची बिनविरोध निवड

 

पारोळा, प्रतिनिधी । कृषि उत्पन्न बाजार समितीत उपसभापती पदासाठी निवडणुक घेण्यात आली. यावेळी शिवसेनेचे दगडू तुळशिराम पाटील यांचे एकमेव नामनिर्देशनपत्र दाखल झाल्यामुळे निवडणुक अधिकारी जी.एच.पाटील यांनी पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीच्या उपसभापतीपदी दगडू तुळशिराम पाटील यांची बिनविरोध निवड झाल्याचा जाहीर केले.

दगडू तुळशिराम पाटील यांच्या उपसभापतीपदीनिवडीबद्दल आमदार चिमणराव पाटील व पारोळा कृषि उत्पन्न बाजार समितीचे सभापती तथा जळगाव जिल्हा बँकेचे संचालक अमोल पाटील यांनी त्यांचे अभिनंदन करून सत्कार केला. यावेळी बाजार समितीचे संचालक चतुर भाऊसाहेब, श्री.डाॕ.पी.के.पाटील, मधुकर पाटील, प्रेमानंद पाटील, प्रा.बी.एन.पाटील , विजय पाटील, दिपक पिंगळे, राजु खाडे, पोपट वंजारी, आशा पाटील, शिवसेना तालुकाप्रमुख प्रा.आर.बी.पाटील, शिवसेना शहरप्रमुख अशोक मराठे, जिजाबराव बापु, श्री.सखानाना, बाजार समितीचे सचिव रमेश चौधरी, शिवसेना उपशहरप्रमुख भुषण भोई आदी. व बाजार समितीचे कर्मचारी उपस्थित होते.

Exit mobile version