Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पारंपारिक वाद्यांवर कोसलाकारांनी धरला ठेका ! (व्हिडीओ )

जळगाव – लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | जैन उद्योग समूहातर्फे पारंपारिक पद्धतीने पोळा सण साजरा करण्यात आला. यावेळी पारंपारिक वाद्यावर कोसलाकार तथा ज्ञानपीठ पुरस्कार प्राप्त डॉ. भालचंद्र नेमाडे, अनुशास्त्रज्ञ डॉ. अनिल काकोडकर यांच्यासह जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी ठेका धरल्याचे पाहायला मिळालं.

 

सालाबादाप्रमाणे जैन उद्योग समूहातर्फे पोळा हा सण मोठ्या थाटात पारंपारिक पद्धतीने साजरा करण्यात आला. याप्रसंगी जैन उद्योग समूहाचे अध्यक्ष अशोक जैन यांनी सपत्नीक सर्जा राज्याचे पूजन केले. तसेच  सालदार व शेतकऱ्यांचा सन्मान करून पोळा सण साजरा केला.   कृषी क्षेत्रात अग्रेसर जळगावातील जैन उद्योग समूहाचा जगभरात विस्तार झाला आहे. या जैन उद्योग समूहातर्फे गेल्या २५  वर्षांपासून पोळा हा मोठ्या उत्सहात साजरा करण्यात येत आहे. जैन समूहाच्या जळगावातील विविध ठिकाणी कार्यरत शाखांच्या ठिकाणी ज्या बैलजोड्या असतात, तसेच सालदार व शेतकरी यांचा यादिवशी सन्मान केला जातो. जैन इरिगेशन येथे पोळ्याच्या दिवशी सर्व बैलजोड्या एकऋ येतात. ग्रामीण भागात ज्या पध्दतीने वातावरण असत, अगदी त्याच पध्दतीने याठिकाणी सजावट केलेली असते.  बैल घेवून शेतकरी धावतात, व जे नारळाचं तोरण बांधलेले असतं, त्याठिकाणच नारळ जो शेतकरी तोडतो, त्या विजेता ठरतो. यावेळी सालदारांना तसेच शेतकऱ्यांना नवीन कपडे, भेटवस्तू  देवून त्यांचा सन्मान केला जातो. याप्रसंगी सालदार, शेतकरी तसेच कंपनीतील कर्मचारी बांधव नृत्य करत आंनद साजरा करतात. कामगार यावेळी शंकर महादेव, बैलासह विविध वेशभूषा यावेळी परिधान करत नृत्य करत असतात. अशा आगळ्या वेगळ्या पध्दतीने पोळा साजरा करण्याची जैन उद्योग समूहाची परंपरा आहे.

दोन वर्षांपासून कोरोनामुळे पोळा सण साजरा करता आला नव्हता. कोरोनाचे सावट ओसल्याने जैन समूहाच्या वतीने  यंदा मोठ्या उत्साहात हा सण साजरा करण्यात आला.  सर्व कर्मचाऱ्यांनी पारंपारिक वाद्य तसेच ढोलताशांच्या तालावर नृत्य करत आनंद साजरा केला.  याप्रसंगी डॉ अनिल काकोडकर,  डॉ. भालचंद्र नेमाडे यांची प्रमुख उपस्थिती होती. यावेळी पारंपारिक वाद्यांवर डॉ. भालचंद्र नेमाडे यांना ठेका धरण्याचा मोह आवरता आला नाही. त्यांना  डॉ. अनिल काकोडकर व अशोक जैन   यांनी साथ देत ठेका धरला.

 

भाग १

 

भाग २

Exit mobile version