Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पामेला गोस्वामी ड्रग्जची व्यसनी

 

 

कोलकाता : वृत्तसंस्था ।   भाजप नेत्या पामेला गोस्वामी यांना ड्रग्ज घेण्याच व्यसन  असल्याचा दावा कोलकाता पोलिसांनी केला आहे. पामेला यांच्या वडिलांकडून तशी माहिती मिळाल्याचं पोलिसांनी सांगितलं आहे.

 

भाजप युवा मोर्चाशी संबंधित  पामेला गोस्वामी आणि प्रबीर कुमार दे यांना अटक झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. कोकीन ड्रग्ज बाळगल्याने पामेला यांना पोलिसांनी अटक केल्यानंतर आता खळबळजनक माहिती समोर येत आहे.

 

पोलिसांनी सांगितल्याप्रमाणे पामेला यांना त्यांच्या एका मित्रामुळे त्यांना ड्रग्ज घेण्याची सवय लागली होती. पामेला यांना ड़्रग्ज घेण्याची सवय असल्यामुळे पामेला यांच्या वडिलांनी त्यांची काळजी घेण्याचे सांगितल्याचेही कोलकाता पोलिसांनी सांगितले आहे. पामेला गोस्वामी यांना अटक झाल्यानंतर पश्चिम बंगालमध्ये राजकारण तापलं आहे. पामेला यांना या प्रकरणात मुद्दामहून गोवले जात असल्याचा आरोप भाजपने केला आहे.

 

दुसरीकडे पामेला गोस्वामी यांनी त्यांच्या पक्षातीलच भाजप खासदार राकेश सिंह यांच्यावर आरोप केले आहेत. राकेश सिंह यांनीच ड्रग्जच्या प्रकरणात फसवल्याचा आरोप पामेला गोस्वामी यांनी केला आहे. मात्र, भाजप खासदार राकेश सिंह यांनी पामेला यांनी केलेले सर्व आरोप फेटाळून लावले असून हे कारस्थान तृणमूल काँग्रेसने केलं असल्याचं त्यांनी म्हटलं आहे.

 

पामेला गोस्वामी २० फेब्रुवारी रोजी आपल्या कारमधून कोकीन हे ड्रग्ज घेऊन जात होती. पोलिसांना  खबर मिळाली. त्यांनी कारवाई केली. या कारवाईत गोस्वामी रंगेहाथ पकडली गेली. पोलिसांनी कोलकाताच्या न्यू अलीपूर भागात तिची गाडी अडवली. यावेळी गाडीत तिच्यासोबत एक सुरक्षा रक्षकही होता. पोलिसांनी गाडीची झडती घेतली असता गाडीत लाखो रुपयांचे ड्रग्ज मिळाले.

Exit mobile version