Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पादचाऱ्याच्या मृत्यूप्रकरणी अज्ञात वाहनचालकावर गुन्हा दाखल

यावल-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । तालुक्यातील कोरपावली-विरावली पायी जात असलेल्या व्यक्तीला अज्ञात वाहनाने जोरदार धडक दिली होती. यात त्यांचा मृत्यू झाला होता. याप्रकरणी यावल पोलीस ठाण्यात अज्ञात वाहन चालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

या संदर्भातील मिळालेली अशी की, सोमवारी २८ नॉव्हेबर रोजी दुपारी १२ वाजेच्या सुमारास कोरपावली येथील राहणारे फिरोज लतीफ तडवी (वय-४२) यांचा कोरपावली ते विरावली रस्त्यावरील महेलखेडी येथील शेतकरी मधुकर रायभान पाटील यांच्या शेताजवळ रस्त्याने जात असतांना यावलकडून कोरपावलीकडे जाणाऱ्या चारचाकी वाहन क्रमांक (एमएच १९ डीव्ही ७२२९) या वाहनास अज्ञात चालकाने पायी जाणाऱ्या तडवी यांना जोरदार धडक दिली. यात त्यांचा उपचारादरम्यान मृत्यू झाला होता. अपघातातील मयताचे भाऊ रशीद लतीफ तडवी वय ४५ वर्ष यांनी २९ नॉव्हेबर रोजी यावल पोलीस ठाण्यात फिर्याद दिल्याने अज्ञात वाहनचालका विरूद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस निरिक्षक राकेश मानगावकर यांच्या मार्गदर्शनाखाली पो.ना. संजय देवरे हे तपास करीत आहे. दरम्यान अपघातास कारणीभुत वाहनास पोलीसांनी जप्त केले आहे.

Exit mobile version