Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पातोंडा ग्रामसभेत हुल्लडबाजीच विविध विषयांवर चर्चा

अमळनेर प्रतिनिधी । तालुक्यातील पातोंडा येथे झालेल्या ग्रामसभेचे आयोजन सरपंच भरत बिरारी यांच्या अध्यक्षतेखाली घेण्यात आली. यावेळी हुल्लडबाजीतच विविध विषयांवर चर्चा झाली.

सविस्तर, शासन नियमानुसार ग्रामसभा घेण्यात आली. यावेळी ग्रामस्थांनी सभेत गावातील अनेक समस्यांचा पाढा वाचला. ग्रामविकास अधिकारी बी.वाय.पाटील यांनी समृद्ध रोजगार कृती आराखडा, राष्ट्रीय ग्रामीण योजना, रोजगार ग्रामीणमध्ये शेतीची कामाची मजूरी ग्रा.प. देईल अशी तरतूद करण्यात आली आहे. रोजगार हमी नाव बदलून समृद्धी रोजगार असे नाव देण्यात आले आहे. ही योजना एप्रिल पासून सुरू होईल, आदी सविस्तर माहिती दिली. यावेळी ग्रामस्थांनी गावातील कामा बाबत रोष व्यक्त करत. अनेक प्रश्न विचारून, समस्यांचा पाढा वाचला.त्यात  गावात मुरूम टाकणे,  स्वच्छता करणे, गावात डेंग्यू ची साथ असून टी सी एल व कीटक नाशक फवारणी करणे, मोकळे भूखंड वरील अतिक्रमण काढणे. अतिक्रमण निघत नसेल तर गुन्हे दाखल करणे, गटारी काढणे, ग्राम पंचायती मध्ये नियमानुसार महापुरुषांच्या फोटो लावणे, विविध राहिलेल्या समिती निवड करणे, गावात आवश्यक ठिकाणी मुरूम टाकणे, जि. प. प्राथमिक मुला- मुलींची शाळा एकत्रीकरण करणे.शाळेत पहिली ते चौथी शाळेचे पहिली ते सातवीपर्यंत वर्गविस्तार करून सेमी इंग्रजी चा दर्जा मिळवणे. शाळेच्या सुसज्ज इमारतीचे बांधकाम करणे. विद्युत सबस्टेशन ते स्मशानभूमी पर्यंत पथदिवे टाकणे, प्लॉट भागातील अतिक्रमण व पाणी काढणे, सध्या गावात जनावरांवर लम्पि आजार मोठ्या प्रमाणात असून पशुवैद्यकीय अधिकारी व कर्मचारी दुपारून राहत नाही.पशुवैद्यकीय दवाखान्यात मुदतबाह्य औषध मिळतात.आदी समस्यांचा पाढा उपस्थित ग्रामस्थांनी वाचला.यावेळी सरपंच व ग्रा.वि.अधिकारी यांनी समाधान कारक उत्तरे देऊन,समस्या  सोडविण्यासाठी प्रयत्न केले जातील. हुल्लडबाजी वगळता सभा शांततेत संपन्न झाली. सभेला उपसरपंच नितीन पारधी, ग्रा.प. सदस्य संदिप पवार, सोपान लोहार, प्रतिभा शिंदे, रेखा पाटील, मनिषा मोरे, शीतल पाटील, दिलीप बोरसे, किशोर मोरे नेहरू पवार, विजय मोरे, रमेश संदानशिव, बापू बिरारी, वामन पाटील, रत्नाकर पवार, राकेश पाटील, समाधान पाटील, प्रशांत बिरारी, अनिकेत धुमाळ,  अजतराव सूर्यवंशी, प्रवीण बिरारी, सुनील पवार आदी बहुसंख्य ग्रामस्थ हजर होते.

Exit mobile version