Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाणीपुरवठा फिल्टर प्लॅन्टवर तुरटी, क्लोरीन गॅस व ब्लिचिंग पावडर तात्काळ उपलब्ध करा; शिवसेनेचे निवेदन (व्हिडीओ)

जळगाव प्रतिनिधी । शहराला होणारा पाणीपुरवठा फिल्टर प्लॅन्टवर तुरटी, क्लोरीन गॅस, ब्लिचिंग पावडर तात्काळ व्यवस्था करावी अशी मागणी शिवसेनाच्या वतीने महापालिका आयुक्त सतिश कुलकर्णी यांनी निवेदनाद्वारे केली आहे.

दिलेल्या निवेदनात म्हटले आहे की, शहरातील पाण्याच्या टाक्या स्वच्छ करून जळगावकरांना स्वच्‍छ पिण्याच्या पाण्याचा पुरवठा करावा यासाठी मागणी शिवसेना पक्षातर्फे २१ जुलै रोजी आयुक्तांना निवेदनाद्वारे मागणी केली होती. तसेच फिल्टर प्लॅन्टवर पाहणीसाठी स्वत: शिवसैनिक गेले असतान त्याठिकाणी तुरटी, क्लोरीन गॅस, ब्लिचिंग पावडर उपलब्ध नव्हते. अस्वच्छ पाणी दिसून आले. फिल्टरच्या ठिकाणी पाणी पुरवठा अधिकाऱ्याची नेमणूक करावी तसेच केमीस्ट टेस्ट, क्लोरींग ऑपरेटर यांची नियुक्त्या करण्यात याव्यात. तरी महापालिकेच्या प्रशासनाने पाणीपुरवठा फिल्टर प्लॅन्टवर तुरटी, क्लोरीन गॅस, ब्लिचिंग पावडर तात्काळ व्यवस्था करावी जेणे करून जळगावकरांना स्वच्छ पाण्याचा पुरवठा होईल.

या निवेदनावर शिवसेनेचे गजानन मालपुरे, संजय कोल्हे, नितीन जावळे, दिनेश पाथरिया, लोकेश पाटील, प्रसाद घोरपडे, ईश्वर नाईक, मंगला बारी, निलू इंगळे, राहुल नेतलेकर, विजय राठोड, नितीन राजपूत, हेमंत महाजन, मनिषा पाटील यांच्यासह शिवसैनिक उपस्थित होते.

https://www.facebook.com/livetrendsnews01/videos/748881852582899/

Exit mobile version