भुसावळ, प्रतिनिधी । तालुक्यातील पाडळसे ग्रामपंचायततर्फे काल पासून गावात धुरळणी व आरोग्य तपासणीस सुरुवात करण्यात आली असून गावातील प्रत्येक कुटुंबाने तपासणीस सहकार्य करण्याचे आवाहन करण्यात आले आहे.
पाडळसे गावातील प्रत्येक कुटुंबाची आरोग्य तपासणी करण्यासाठी शासनाकडून नेमलेल्या सर्वेक्षण नियुक्त समित्यांना थर्मल गण व ऑक्सिमीटर चे वाटप करण्यात आले असून गावातील प्रत्येक कुटुंबांने स्वत:हून तपासणीसाठी सहकार्य करावे , जेणे करून कोरोना फैलावाला आळा घातला जाईल . तसेच प्राथमिक आरोग्य केंद्रात सुरू असलेले कोरोना प्रतिबंधक लसीकरण ४५ वर्षापुढील प्रत्येक व्यक्तीने न चुकता करून घ्यावे. तसेच कुठल्याही अफवांवर विश्वास ठेवू नये अशी कळकळीची विनंती प्रभारी सरपंच खेमचंद कोळी, ग्रा.वि.अधिकारी श्री.मोरे व सर्व ग्रामपंचायत सदस्य कमिटीतर्फे करण्यात आले आहे.