Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाडळसरेत आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस साजरा

अमळनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  तालुक्यातील पाडळसरे येथे हनुमान मंदिर प्रांगणात गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज जयंती व आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवसानिमित्ताने चक्रवर्ती सम्राट गुर्जर राजा मिहीर भोज राजा यांच्या प्रतिमेचे पूजन करून अभिवादन करण्यात आले.

 

 

भाद्रपद महिन्यातील शुक्ल पक्षाचा तृतीय तीथी ही धर्मरक्षक गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज गुर्जर यांची जयंती देशभरातील गुर्जर समाज बंधव  आंतरराष्ट्रीय गुर्जर दिवस म्हणून साजरा करतात. त्याचे आजचे तेरावे वर्ष असून भाद्रपद शुक्ल तृतीयानिमित्त साधून आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचे आयोजन अखिल भारतीय वीर महासभेकडून करण्यात आले होते. त्यात पाडळसरे येथे झालेल्या कार्यक्रमात निम, कलाली, पढावद व तांदळी येथील  गुर्जर बांधव उपस्थित होते. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी पंडित आबा गुर्जर हे होते तर प्रमुख पाहुणे गुर्जर भवन समितीचे माजी अध्यक्ष डॉ. एल. डी. चौधरी, जिल्हा नियोजन समितीचे सदस्य भागवत पाटील, अखिल भारतीय वीर गुर्जर महासभेचे राष्ट्रीय सोशल मीडिया अध्यक्ष तथा पत्रकार वसंतराव गुर्जर यांची विशेष उपस्थिती होती.   यावेळी नवतरुण व गुर्जर बांधवांनी फेटा परिधान करून आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचा उत्सव साजरा केला .

कार्यक्रमात प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते गुर्जर सम्राट राजा मिहीर भोज गुर्जर यांच्या प्रतिमेला माल्यार्पण करून पूजन करण्यात आले. यावेळेस समाजातील मान्यवरांच्या विशेष निवडीबद्दल सत्कार करण्यात आला. यावेळी वसंतराव गुर्जर यांनी आंतरराष्ट्रीय गुर्जर दिनाचे महत्त्व विशद केले. तर डॉ. एल. डी. चौधरी यांनी मिहीर भोज गुर्जर यांचा जिवन पट व इतिहासातील गुर्जर साम्राज्याची नोंदी विषद केल्या.  यावेळी माजी सरपंच रमेश गुर्जर, शिरीष चौधरी मित्र परिवाराचे रणछोड गुर्जर, सार्वजनिक वाचनालयाचे उपाध्यक्ष मधुकर गुर्जर , माजी सरपंच सचिन पाटील, संदीप गुर्जर, शिवसेनेचे उप तालुका प्रमुख चंद्रशेखर गुर्जर, विकास सोसायटीचे चेअरमन मंगल गुर्जर, माजी चेअरमन डिगंबर गुर्जर, युवा सेनेचे ईश्वर गुर्जर आदींची उपस्थिती होती. यशस्वीतेसाठी सरदार पटेल मित्र मंडळाचे निलेश गुर्जर, रामकृष्ण गुर्जर, विकास गुर्जर , गौरवकुमार गुर्जर , शुभम गुर्जर , समाधान गुर्जर, राधेश्याम गुर्जर, अलोक गुर्जर आदींनी परिश्रम घेतले.

 

Exit mobile version