Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाटणा येथे गारगोटी चोरट्याला वनाधिकारीने केले जेरबंद

चाळीसगाव, प्रतिनिधी । तालुक्यातील पाटणा राखीव वन परिक्षेत्रात मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती मिळताच वनाधिकारीने सापळा रचून एकाला जेरबंद केले असून त्याच्याकडून गौण खनिजांचे १३ बॉक्स हस्तगत करण्यात आले आहे.

सविस्तर वृत्त असे की, पाटणा राखीव वन परिक्षेत्रातील कक्ष क्र. ३०३ मध्ये मौल्यवान गारगोटीचे उत्खनन होत असल्याची माहिती वन परिक्षेत्र अधिकारी शेळके यांना रविवार, ६ रोजी मिळाली. त्यावर वन परिक्षेत्र अधिकारी शेळके यांनी आपल्या सोबत राम डुकरे (वनरक्षक पाटणा ) व इतर कर्मचाऱ्यांना   घेऊन सदर ठिकाणी छापा टाकला असता अरबाज याकुबखा पठाण (रा. ब्राम्हणी गराडा ता. कन्नड) हा गौण खनिज उत्खनन करत असताना आढळून आला. त्याला ताब्यात घेण्यात आले असून त्याच्या जवळील खनिजांचे १३ बॉक्स (वजन ६८ कि.‌ग्रॅ) हस्तगत करण्यात आले आहे. वन्यजीव संरक्षण अधिनियम १९७२ चे कलम २७,२९,३१ व १९२७ चे कलम २६ (१) नुसार गुन्हा दाखल करण्यात आले असून सोबतचे ९ जणांचा तपास सुरू आहेत. हि कारवाई विभागीय वन अधिकारी विजय सातपुते (औरंगाबाद), वन्यजीव रक्षक राजेश ठोंबरे, सहायक वनसंरक्षक आशा चव्हाण (कन्नड) यांच्या मार्गदर्शनाखाली वन परिक्षेत्र अधिकारी राहूल शेळके (चाळीसगाव), राम डुकरे (वनरक्षक पाटणा), अजय महिरे (वनरक्षक बोढरे), वनमजूर अनिल शितोळे, राजाराम चव्हाण, मेघराज चव्हाण, गोरख राठोड, कांतीलाल नांगरे, अनिल धादवाड, नाना पवार व इतर आदींचा यात समावेश आहेत.

 

 

Exit mobile version