Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; नागपूरच्या पतीसह चार जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । जळगाव शहराती अजिंठा चौफुली येथील माहेर असलेल्या विवाहितेला कर्ज फेडण्यासाठी माहेरहून पाच लाख रूपये आणावे यासाठी छळ करणाऱ्या नागपूर येथील पतीसह चारजणांविरूध्द एमआयडीसी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

अधिक माहिती अशी की, जळगाव शहराती अजिंठा चौफुलीजवळ राहणारी विवाहिता मानसी चेतन सोनकुसळे रा. नागदपूर गरबी नागपूर यांचा विवाह नागरपूर येथील चेतन माधवरावजी सोनकुसळे यांच्याशी झालेला आहे. सुरूवातीचे काही दिवस आनंदाने गेले. त्यानंतर घराचे कर्ज फेडण्यासाठी पती चेतन सोनकुसळे यांनी मारहाण करण्यास सुरूवात केली. माहेरहून ५ लाख रूपये आणावे यासाठी शिवीगाळ व माहारण करण्यास सुरूवात केली. सासरकडील मंडळी यात सासू उमा माधवरावजी सोनकुसळे, माया दिलीप पाठराबे आणि नंदोई दिलीप पाठराबे यांनी देखील शिवीगाळ करण्यास सुरूवात केली. सासरच्या छळाला कंटाळून पिडीत विवाहिता ही जळगाव येथील माहेरी निघून आल्या. विवाहितेच्या फिर्यादीवरून एमआयडीसी पोलीस ठाण्यात पतीसह चार जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास सपोनि अमोल मोरे करीत आहे. 

Exit mobile version