Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखासाठी विवाहितेचा छळ; पतीसह पाच जणांवर गुन्हा

जळगाव प्रतिनिधी । दिराच्या लग्नासाठी माहेरहुन पाच लाख रूपये आणावे यासाठी जळगाव येथील माहेरवाशीनीचा छळ करणाऱ्या नंदुरबार येथील पतीसह पाच जणांवर जळगाव शहर  पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. 

पोलीसांकडून मिळालेली माहिती अशी की, यास्मिनबी शेख वासिम (वय-२०) यांचा विवाह नंदुरबार येथील वसिम शेख सत्तार यांच्याशील रितीरिवाजानुसार ८ मार्च २०२० रोजी झाला. लग्न झाल्यानंतर आठ ते दहा दिवसानंतर दिराच्या लग्नासाठी पती वसिम शेख यांनी शिवीगाळ व मारहाण करण्यास सुरूवात केली. त्यानंतर तुला जेवन न देता मारून टाकु अशी धमकी देवून मारहाण केली. तसेच शेख सत्तर शेख इसार (सासरे), शमशाद शेख  सत्तार (सासू), दिर शख अझहर शेख सत्तार आणि नणंद सुमेय्या शेख सत्तार सर्व राहणार. मुजावर मोहल्ला नंदुरबार यांनी विवाहितेला चिमट्या काढून मानसिक व शारिरीक छळ केला. हा छळाला कंटाळून विवाहिता माहेरी निघून आल्या. शहर पोलीस गाठून पतीसह सासरकडील पाच जणांविरूध्द गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोहेकॉ राजेंद्र परदेशी करीत आहे.

Exit mobile version