Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच लाखांसाठी विवाहितेचा छळ

 

जामनेर-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जामनेर शहरातील माहेर असलेल्या  विवाहितेला माहेर होऊन ५ लाख रुपये आणावे, या मागणीसाठी मारहाण करून शारीरिक व मानसिक छळ केल्याचा प्रकार समोर आला आहे. याबाबत जामनेर पोलीस ठाण्यात पतीसह सासरच्या मंडळींविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

 

जामनेर पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, जामनेर शहरातील माहेर असलेल्या असिया इफ्तेखार देशमुख यांचा विवाह जळगाव शहरातील सलार नगरातील इफ्तेखार साजिद देशमुख यांच्याशी रीतीरिवाजानुसार झालेला आहे.  लग्नाचे सुरुवातीस तीन महिन्यानंतर घरगुती कारणावरून विवाहितेला मारहाण करण्यास सुरुवात केली. त्यानंतर फ्रिजचे रिपेरिंगचे दुकान टाकण्यासाठी माहेरहून ५ लाख रुपये आणावे, अशी मागणी केली, विवाहितेच्या  आई-वडिलांचे परिस्थिती नाजूक असल्यामुळे तिने पैसे आणले नाही. याचा राग आल्याने पतीसह सासू-सासरे व इतरांनी शारीरिक व मानसिक छळ केला. हा प्रकार घडल्यानंतर विवाहिता माहेरी निघून आल्या. गुरुवार १६ फेब्रुवारी रोजी सकाळी ७ वाजता जामनेर पोलीस ठाण्यात धाव घेऊन तक्रार दिली. त्याने दिलेल्या तक्रारीवरून पती इफ्तेखार साजिद देशमुख, सासू मैदाबी साजिद देशमुख, सासरे साजिद तैमूर देशमुख, ननंद सिमरन सादीक शेख, नंदोई भाऊ सादीक नजाकत शेख, मावस सासू शबाना शेख मुख्तार, मावस सासरे मुख्तार शेख समद, जाबीर खलील देशमुख, खलील देशमुख सर्व राहणार सलार नगर, जळगाव यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पुढील तपास पोलीस नाईक अमद मुकेश आमोदकर करीत आहे.

Exit mobile version