Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाच कुटुंबांमधील ३५ जणांनी स्वीकारला हिंदू धर्म

पानीपत वृत्तसंस्था । मुगल काळात धर्मांतरीत झालेल्या पाच कुटुंबांमधील ३५ जणांनी विधीवत हिंदू धर्मात प्रवेश केला असून खाप पंचायतीने त्यांचे स्वागत केले आहे.

पानीपत येथील एका मुस्लीम युवकाने हरीद्वारे येथे नऊ वर्षांपर्यंत तपस्या केली. यानंतर त्याने आपल्या कुटुंबियांसह हिंदू धर्म स्वीकारण्याची इच्छा व्यक्त केली. हिंदू युवा वाहिनी आणि खाप पंचायतीच्या मदतीने हा तरूण आणि त्याच्यासह एकूण पाच कुटुंबांमधील ३५ जणांनी हिंदी धर्म स्वीकारला. यासाठी एका कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले. धर्मांतर करण्यासाठी तप करणार्‍या युवकाचे नाव नसीब असून त्याने आपण कुणाच्याही दबावात न येता धर्मांतर केल्याचे सांगितले. मुघल काळात आपल्या पूर्वजांनी हिंदू धर्म सोडून मुस्लीम धर्म स्वीकारला होता. आता आपण पुन्हा मूळ धर्मात परतलो असल्याची माहिती त्याने प्रसारमाध्यमांना दिली.

दरम्यान, या ३५ जणांसाठी पानीपत जवळच असणार्‍या आसनगाव येथे धार्मिक कार्यक्रम आयोजित करण्यात आला. यात यज्ञ-हवन होऊन सर्वांना हिंदू धर्मात प्रवेश देण्यात आला. खाप पंचायतीचे प्रधान दादा बलजीत सिंह मलीक यांच्यासह अन्य मान्यवरांची याप्रसंगी उपस्थिती होती.

Exit mobile version