Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात श्री. स्वामी समर्थ केंद्राचा वर्धापनदिन उत्साहात

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील संघवी कॉलनीतील दिंडोरी प्रणित श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार सेवा केंद्राचा २२ वा वर्धापनदिन दिन अतिशय उत्साहात साजरा करण्यात येत आहे. दिवसभर भरगच्च कार्यक्रम घेत संपूर्ण परिसर भक्तीमय झाला आहे.

 

श्री. स्वामी समर्थ अध्यात्मिक व बालसंस्कार केंद्र (दिंडोरी प्रणित) या केंद्राची स्थापना जुलै – २००१ या वर्षी झाली आहे. त्याच अनुषंगाने आज दि. १० जुलै २०२२ रोजी देवयानी आषाढी एकादशीच्या दिवशी या केंद्राचा २२ वा वर्धापनदिन उत्साहात साजरा करण्यात येत आहे. सकाळी ८ वाजता भुपाळी आरती, १०:३० वाजता नैवेद्य आरती तद्नंतर श्रीमद् भागवत ग्रंथाचे वाचन, दुपारी ४ वाजता स्वामी याग व सायंकाळी ६:३० वाजता नैवेद्य आरती अशा भरगच्च भक्तीमय कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. याप्रसंगी शहरातील महिला, पुरुष, बालगोपाल हे मोठ्या संख्येने उपस्थित राहुन श्री. स्वामी समर्थांचे दर्शन घेत आहे.या कार्यक्रमास सेवेकरी राम जळतकर, केंद्र प्रतिनिधी गोकुळ पाटील, संजय पाटील, पितृभक्त बी. जे. पाटील सह अन्य सेवेकरी अहोरात्र परिश्रम घेत आहेत‌.

Exit mobile version