Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात शिवसेना व संभाजी ब्रिगेडची युती

पाचोरा- लाईव्ह ट्रेंड्स न्यूज प्रतिनिधी | महाराष्ट्रात नुकतीच शिवसेना व संभाजी ब्रिगेड युतीची घोषणा करण्यात आली आहे. या पार्श्वभूमीवर महाराष्ट्रात पहिलाच कार्यक्रम पाचोरा येथे  शिवसेना व संभाजी ब्रिगेड यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करत शिवसेना व संभाजी ब्रिगेड पदाधिकार्‍यांनी ऐकीचा संदेश दिला.

 

शिवसेनेच्या पाचोरा तालुक्याच्या नेत्या वैशाली सूर्यवंशी व छत्रपती संभाजी ब्रिगेड या संघटनेचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील यांनी छत्रपती संभाजी महाराज यांच्या प्रतिमेचे पूजन करून शिवसेना व संभाजी ब्रिगेड युतीची सुरुवात केली.  या कार्यक्रमास शिवसेनेचे उद्धव मराठे, रमेश बाफना,  ॲड. अभय पाटील, तालुका प्रमुख  शरद पाटील, गणेश परदेशी, ॲड. दिपक पाटील, दत्ता जडे, नरेंद्रसिंग सुर्यवंशी, दादा चौधरी, अनिल सावंत,  पप्पू जाधव, खंडू सोनवणे, आनंद संघवी, अजय पाटील, शेख गफ्फार गय्यास, संजय चौधरी, बबलु भोई, नंदु शेलार, संदिप जैन, लुकमान बागवान, तसेच छत्रपती संभाजी ब्रिगेडचे जिल्हाध्यक्ष प्रविण पाटील, गणेश पाटील, जिभाऊ पाटील, सुरेश शिंदे, मुकेश तुपे,  मुजाहिद खान, एस. ए. पाटील, सुधाकर पाटील, दिपक मुळे, कुणाल पाटील, विजय जाधव, पितांबर राठोड, संजय राठोड, योगेश जाधव, सचिन पाटील, विजय जाधव, सुधीर पाटील, अमर पाटील, गफ्फार पटेल, नाना वाघ, राजेंद्र पाटील, राजेंद्र भोसले, आदिल शेख, हनान बागवान, अब्रार पिंजारी, मोसिम पिंजारी, असिफ खाटीक उपस्थित होते.

Exit mobile version