Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात विकास कामांसाठी ११२ कोटी रुपयांचा निधी मंजूर

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  पाचोरा मतदार संघातील रस्ते, राम मंदिराचे सुशोभीकरण, तहसिलदारांचे निवासस्थान, विश्राम गृहाची नविन इमारत यासह सुमारे ११२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्याची माहिती आमदार किशोर पाटील यांनी त्यांच्या निवासस्थानी आयोजित पत्रकार परिषदेत दिली.

 

आमदार किशोर पाटील म्हणाले की, राज्यात मी गेल्या ८ वर्षांपासून बजेट होतांना पहात आहे. राज्याचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी सादर केलेला या वर्षाचा बजेट हा सर्वसमवयक असुन तो वाखांण्याजोगा आहे. या बजेट मध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी पाचोरा मतदार संघाला सरळ हाताने मदत करत रस्ते, राम मंदिराचे सुशोभीकरण, तहसिलदारांचे निवासस्थान, विश्राम गृहाची नविन इमारत यासह सुमारे ११२ कोटी रुपयांचा निधी मंजूर करुन दिल्याची माहिती त्यांनी दिली.

 

याप्रसंगी जिल्हाप्रमुख रावसाहेब पाटील, तालुका प्रमुख सुनिल पाटील, जिल्हा परिषद सदस्य पदमसिंग पाटील, शहर प्रमुख किशोर बारावकर, मा. नगरसेवक ज्ञानेश्वर चौधरी, विधानसभा क्षेत्र प्रमुख इंदल परदेशी, युवासेनेचे तालुका प्रमुख योगेश पाटील, राजेंद्र परदेशी, पंढरीनाथ पाटील, देविदास पाटील, अनिल पाटील, प्रविण ब्राम्हणे, स्वीय्य सहाय्यक राजेश पाटील उपस्थित होते.

 

पाचोरा – भडगाव तालुक्यात या वर्षाच्या बजेट मध्ये ११२ कोटी रुपयांच्या निधी मध्ये श्रीराम मंदिराच्या सुशोभीकरणासाठी १० कोटी रुपये, तहसिलदार यांच्या निवासस्थानासाठी ६० कोटी रुपये, प्रमुख रस्त्यांमध्ये डोंगरगाव ते शेवाळे, सातगाव (डोंगरी)  ते शेवाळे, बांबरुड ते अंतुर्ली, सारोळा – मोंढाळा रस्ता, अंतुर्ली – तारखेडा रस्ता, परधाडे ते पाचोरा रेल्वे लाईन जवळील रस्ता, माहेजी ते दहिगाव, अंबेवडगाव ते कोल्हे, बांबरुड (राणीचे) ते आसनखेडा, गिरणा पुलापासून पुनगाव रस्ता, लासगाव ते स्मशानभूमी रस्ता, नेरी ते आखतवाडे रस्ता, नगरदेवळा ते निपाणे रस्ता, वडगाव बारापुलाचे ते नगरदेवळा, बाळद ते उपलखेडा, वडगाव मुलाने ते दिघी, सातगाव ते मादनी तांडा, सातगाव ते गव्हले, शिंदाड ते पिंप्री, वाडी ते वाणेगाव, शिंदाड ते सातगाव वाटर सप्लाय पर्यंत, पिंपळगाव ते बहुलखेडा, पिंपळगाव ते उमरविहीरे, सावखेडा ते चिंच फाटा, वाडी ते राजुरी शिव, खडकदेवळा ते मोंढाळे, पुनगाव ते अंतुर्ली, भातखंडे ते ओझर, वाणेगाव ते राजुरी, लासगाव ते कुरंगी, गाळण ते नाचणखेडा, आखतवाडे ते खाजोळा, वरखेडी, सावखेडा, डांभुर्णी, पिंप्री, वरसाडे या रस्त्यांच्या कामासाठी मोठा निधी मंजूर केला असुन भविष्यातील सन – २०२३ / २०२४ च्या आमदार निधीतून मतदार संघातील प्रत्येक गावातील युवकांसाठी व्यायाम शाळा व गाव तेथे शिव स्मारक उभारुन फेब्रुवारी – २०२४ ची शिव जयंती ही प्रत्येक गावात शिव स्मारकाचे पुजन करुन साजरी केली जाणार असल्याचे आ. पाटील यांनी सांगितले.

Exit mobile version