Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात वंचित बहुजन आघाडीचे निवेदन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । घरगुती गॅस सिलेंडर, व्यावसायिक गॅस सिलेंडर, जीवनावश्यक वस्तूंच्या वाढलेल्या किंमती, दिवसेंदिवस वाढती बेरोजगारीच्या विरोधात तसेच शेतकऱ्यांच्या कापसाला १२ हजार रुपये हमीभाव मिळावा. या मागण्यांसंदर्भात वंचित बहुजन आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे व वंचित बहुजन आघाडीचे तालुकाध्यक्ष अनिल लोंढे यांच्या नेतृत्वाखाली १३ मार्च रोजी उपविभागीय अधिकारी डॉ. विक्रम बांदल, तहसिलदार कैलास चावडे व पाचोरा पोलिस प्रशासनास निवेदन देण्यात आले.

 

निवेदन देते प्रसंगी वंचित बहुजन महिला आघाडीच्या जिल्हाध्यक्षा संगिता साळुंखे, तालुका अध्यक्ष अनिल लोंढे, उपाध्यक्षा संजीवनी रत्नपारखी, सचिव लता सपकाळे, पौर्णिमा सोनवणे, कांता कदम, आशा ब्राम्हणे, रत्ना खरे, पाचोरा तालुका महासचिव सुनिल कदम, नगरदेवळा शहर अध्यक्ष किरण निकम, उपाध्यक्ष रवि पवार, गट प्रमुख जयदेव बागुल, उपगट प्रमुख वाल्मिक पवार, माजी तालुका महासचिव सुनिल सुरडकर उपस्थित होते. येत्या दोन दिवसांत निवेदनाचा योग्य विचार न झाल्यास वंचित बहुजन आघाडीतर्फे १६ मार्च २०२३ रोजी लोकशाही मार्गाने तीव्र आंदोलन छेडण्याचा इशारा देखील या निवेदनाद्वारे प्रशासनास देण्यात आला आहे.

Exit mobile version