Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाडव्यानिमित्त पथसंचलन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । हिंदू नववर्षानिमित्त पाडव्याच्या शुभ मुहूर्तावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे पाचोर्‍यात सकाळी पथसंचलन करण्यात आले.

शहरातील मानसिंगका मैदानावर राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या स्वयंसेवकांनी गणवेशात शहरातील छत्रपती शिवाजी महाराज चौक, देशमुखवाडी, बाहेरपुरा, आठवडे बाजार, गांधी चौक, जामनेर रोड मार्गे पथसंचलन करण्यात आले. यावेळी संघाच्या घोष पथकाने देखील सहभाग घेतला होता. यावेळी राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जळगाव विभागाचे कार्यवाहक अविनाश नेहते यांनी बौद्धिक दिले.

संघाची शिस्त, संघ संस्थापकांचा जन्मदिवस व कार्य प्रणाली, राष्ट्रीय सेवाभाव, जनसेवा, देश हित याविषयी मोलाचे मार्गदर्शन केले. यावेळी पाचोरा तालुक्याची विभागणी करून संघदृष्ट्या पाचोरा व पिंपळगाव (हरेश्वर) असे दोन भागात विभाजन करून नव्याने कार्यकारिणी घोषित केली. शहरातील नागरिकांनी संघशक्तीचा व शिस्तप्रिय पथसंचलनाचे कौतुक केले.

Exit mobile version