Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेचे बोंबाबोंब आंदोलन (व्हिडीओ)

पाचोरा, प्रतिनिधी । राष्ट्रीय मुलनिवासी बहुजन कर्मचारी संघटनेतर्फे विविध मागण्यांसाठी पाचोरा येथे तहसिल कार्यालयासमोर घोषणाबाजी करत बोंबाबोंब आंदोलन करण्यात आले. 

आंदोलन नंतर संघटनेच्या विविध मागण्यांचे निवेदन तहसिलदार कैलास चावडे यांना देण्यात आले. यावेळी जिल्हा प्रतिनिधी विकास पाटील, बामसेफ तालुका अध्यक्ष सुनिल भिवसने, शिक्षक प्रतिनिधी ज्ञानेश्वर पाटील, अजय अहिरे, प्रोटान सलिम पिंजारी, एम. एस. आर. टी. सी. राजेंद्र पाटील, राष्ट्रीय आदीवासी एकता परिषदचे जाकीर तडवी, गफ्फुर तडवी, सुनिल शिंदे, दिपक आदीवाल, राष्ट्रीय मुस्लिम तालुका अध्यक्ष हमीद शाह, राकेश सपकाळे, अलताब पटेल, किशोर डोंगरे, रहिम तडवी, दिनेश पाटील, भिमराव खैरे सह पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version