Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात भाजपा युवामोर्चाने विद्यापीठ सुधारणा विधेयकाचा निषेध

पाचोरा, प्रतिनिधी । नुकत्याच संपलेल्या हिवाळी अधिवेशनात महा विकास आघाडी सरकारने राज्यातील सर्व विद्यापीठांवर वर्चस्वासाठी “विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक” मंजूर केल्याचा आरोप करत भारतीय जनता युवा मोर्चा, पाचोरा तालुक्यातर्फे राज्य सरकारचा निषेध करण्यात आला.

 

महा विकास आघाडी सरकारने भारतीय जनता पार्टीसह सर्व विरोधी पक्षांना विश्वासात न घेता “विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयक” मंजूर केले. सदर विधेयेकावर कोणत्याही प्रकारची चर्चा करण्यात आलेली नाही. सदर कायद्या विरोधात भारतीय जनता युवा मोर्चा, पाचोरा तालुक्याच्या वतीने एस. एस. एम. एम. महाविद्यालय, पाचोरा येथे भाजपा तालुकाध्यक्ष अमोल शिंदे यांच्या मार्गदर्शनाखाली आंदोलन करण्यात आले. महाविकास आघाडी सरकारच्या विद्यापीठ कायदा सुधारणा विधेयकामुळे राज्यातील विद्यापीठांची स्वायत्तता संपुष्टात येऊन विद्यापीठे राजकारणाचा अड्डा बनतील आणि शिक्षणाच्या दर्जा घसरून युवा वर्गाचे कायमस्वरूपी नुकसान होईल. राज्यातील विद्यार्थ्यांचे भवितव्य संकटात आणणारे हे काळे विधेयक असून राजकीय स्वार्थासाठी विद्यापीठाच्या कामात हस्तक्षेप करणाऱ्या आघाडी सरकारच्या विरोधात भाजयुमो पाचोराकडून विरोध करणारे बॅनर लावून विद्यार्थ्यांना विषया संबंधी माहिती देण्यात आली व जागरूक करण्यात आले. या काळ्या विधेयकाला विरोध दर्शवण्यासाठी ७७४ ५०५० १११ या क्रमांकावर मिस कॉल देण्याचे विद्यार्थ्यांना आवाहन करण्यात आले. यावेळी तालुका सरचिटणीस गोविंद शेलार, शहर सरचिटणीस दिपक माने, भाजयुमो तालुकाध्यक्ष मुकेश पाटील, भाजयुमो शहराध्यक्ष समाधान मुळे, भाजपा चिटणीस जगदीश पाटील, भाजयुमो सरचिटणीस योगेश (भैय्या) ठाकूर, कुमार खेडकर भाजयुमो उपाध्यक्ष राहुल गायकवाड, नितेश पाटील, आकाश ठाकरे, सोहन मोरे, उदय सूर्यवंशी, मच्छिंद्र पाटील, प्रवीण महाजन, रोहन मिश्रा, कुणाल मोरे, ओम जाधव, यश जाधव, सुमित पाटील, मयूर चव्हाण, दिपक पाटील, कुणाल कनखरे, रितेश पाटील, साई पाटील, श्रेयश पाटील, वैभव पाटील आदि पदाधिकारी उपस्थित होते.

Exit mobile version