Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात भरारी पथकांकडून कृषी केंद्राची झाडाझडती

पाचोरा – लाईव्ह ट्रेन्ड्स न्यूज प्रतिनिधी | सध्या खरीप हंगामाची लगबग सुरू झाली आहे. त्यात बोगस बियाणेची विक्री होऊ नये यासाठी आज भरारी पथकाने अचानक एका कृषी केंद्राची झाडाझडती घेतल्याने तालुक्यात खळबळ उडाली आहे.

पाचोरा तालुक्यात जिल्हा अधिक्षक कृषि अधिकारी जळगांव यांच्या आदेशान्वये तालुका कृषि अधिकारी पाचोरा यांच्या मार्गदर्शनाखाली तालुक्यात स्थापीत भरारी पथकांव्दारे आज रोजी तालुक्यात ३५ ठिकाणी कृषि केंद्रांवर अचानक तपासणी करण्यात आली. त्यामध्ये खरीप-२०२३ च्या हंगामाच्या दृष्टीने शेतकऱ्यांना लागणारे विविध प्रकारचे कापसाचे पसंतीचे बियाणे शासनाने ठरवुन दिलेल्या विक्री किंमतीतच उपलब्ध होण्याच्या दृष्टीने विक्रेत्यांचे साठा रजीष्टर ची पडताळणी करुन त्या ठिकाणी कृषि विभागाचे अधिकारी कर्मचारी यांनी विक्री केंद्रावर पुर्णवेळ थांबुन बियाणे वितरण करावे. व शासकीय किंमतीत विक्री होण्यासाठी कामकाज सुरु केलेले आहे. त्यात प्रामुख्याने तालुक्यातील मोठ्या गावातील अधिकृत विक्रेते यांच्या विक्री केंद्रावर कृषि अधिकारी कर्मचारी यांच्या सेवा लावण्यात येवुन त्यांच्या देखरेखी खालीच बियाणे वितरणाचे काम सुरु आहे. दरम्यान लिंकींग व जादा दराने होणारी विक्री ही पुर्णपणे थांबविण्यासाठी कृषि विभागाने मोहिम हाती घेतली आहे. तसेच तालुका कृषि अधिकारी आर. एन. जाधव यांनी शेतकऱ्यांना आवाहन केले आहे की, तालुक्यामध्ये बियाणे वितरणामध्ये कोठेही गैरप्रकार दिसुन येणार नाही. आपणास दिसुन आल्यास तात्काळ कृषी विभागास कळवावे. कोठेही अनुचीत प्रकार घडल्यास योग्य ती कायदेशीर कार्यवाही संबंधीतांवर करण्यात येणार असल्याचे आर. एन. जाधव यांनी सांगीतले आहे. शेतकऱ्यांना योग्य भावात बियाणे मिळावे याची पूर्तता केली जात असून यासाठी तालुका कृषि अधिकारी, पंचायत समिती कृषि अधिकारी, कृषि पर्यवेक्षक, कृषि सहायकां सह सर्व मंडळी सर्तकतेने कामकाज करीत आहेत.

पुढील ठिकाणी छापा टाकण्यात आले…

त्यात प्रामुख्याने लोहारा, कुऱ्हाड, पाचोरा, पिंपळगांव, नगरदेवळा येथील सर्वच विक्री केंद्रांवर तपासणी करण्यात आली. व कोठेही गैरप्रकार होवु नये म्हणुन कृषि विभागाचे अधिकारी व कर्मचारी सतर्कतेने तेथे आपली सेवा देत असुन शेतकऱ्यांच्या पाठीशी खंबीर पणे उभी राहीलेली आहे. या भरारी पथकांमध्ये तालुका कृषि अधिकारी आर. एन. जाधव, पंचायत समिती कृषि अधिकारी‌ एम. एस. भालेराव, मंडळ कृषि अधिकारी एस. आर. मोहिते, के. एन. घोंगडे, कृषी पर्यवेक्षक के. एफ. पाटील. यु. आर. जाधव आदींसह सर्व कृषि सहाय्यक यांचा समावेश आहे.

Exit mobile version