Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात बेवारस सायकली सापडल्या; ओळख पटविण्याचे आवाहन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । पाचोरा शहरातील विविध भागातून बेवारसरित्या सायकली आढळून आले आहे. पाचोरा पोलीसांनी सर्व सायकली जप्त करून पोलीस ठाण्यात आणण्यात आले आहे.

याबाबत अधिक माहिती अशी की, पाचोरा शहरातील विविध भागातून मिळुन आलेल्या बेवारस सायकलींची ओळख पटविण्याचे आवाहन पाचोरा पोलिसांतर्फे करण्यात आले आहे. ज्या कोणाच्या सायकली असतील त्या सायकलच्या मुळ मालकांनी सायकली संदर्भात योग्य ती कागदपत्रे घेऊन पाचोरा पोलिस स्टेशनच्या (०२५९६ – २४०१३३) या दुरध्वनी क्रमांकावर अथवा पोलिस स्टेशनचे पोलिस नाईक विश्वास देशमुख यांच्या ७७३८५९३३९९ या भ्रमणध्वनीवर संपर्क साधावा असे आवाहन पाचोरा पोलिस स्टेशनतर्फे करण्यात आले आहे.

Exit mobile version