Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात पेट्रोल, डिझेल दरवाढी विरोधात शिवसेनेचे आंदोलन (व्हिडिओ)

 

पाचोरा, प्रतिनिधी । पेट्रोल आणि डिझेलच्या वाढलेल्या दरांच्या निषेधार्थ पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतिने जोरदार घोषणाबाजी करून तहसील कार्यालय येथे आंदोलन करण्यात आले.

दिवसेंदिवस पेट्रोल आणि डिझेलचे दर गगनाला भिडत आहे. पेट्रोलने तर नव्वदी पार केली आहे. या दरवाढी मुळे सर्व सामान्य जनमाणसांच्या जीवनावर विपरित परिणाम होत आहेत. दुसरीकडे महागाई वाढतच आहे. इंधन दरवाढीसोबतच महागाई वाढत आहे. या प्रकाराकडे केंद्र शासन हेतुपुरस्सर दुर्लक्ष करीत आहे. म्हणून केंद्र शासनाच्या विरोधात जनआक्रोश तयार झाला आहे. हा जनआक्रोश केंद्र शासनाप्रर्यंत पोहचविण्याच्या उद्देशाने पाचोरा तालुका शिवसेना, युवासेना आणि महिला आघाडीच्या वतिने पाचोरा तहसील कार्यालय समोर धरणे आंदोलन करण्यात आले. याप्रसंगी केंद्र शासनाविरुध्द जोरदार घोषणाबाजीमुळे तहसिल कार्यालय आवार दणाणले होते. याप्रसंगी उपस्थितांनी तहसिलदार कैलास चावडे यांना निवेदन देण्यात आले. यावेळी जि. प. सदस्य रावसाहेब पाटील, पदमसिंग पाटील, मा. जिल्हा उपाध्यक्ष गणेश पाटील, शहर अध्यक्ष किशोर बारावकर, सुमित किशोर पाटील, सुधाकर महाजन, नगरसेवक बापु हटकर, दादाभाऊ चौधरी, अॅड. राजेंद्र परदेशी, जितेंद्र पेंढारकर, संदिपराजे पाटील, गजानन पाटील, ज्ञानेश्वर चौधरी, सौरभ चेडे, विजय भोई, सुष्मा पाटील, मंदा पाटील, उर्मिला शेळके, स्मिता बारावकर, कल्पना पाटील, अरुणा पिंगळे, रंजना आमले, संतोष हटकर सह शिवसेना युवासेना आणि महिला आघाडी कार्यकर्ते मोठ्यासंख्येने उपस्थित होते.

 

Exit mobile version