Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात दोन दिवसीय विविध मैदानी स्पर्धांचे आयोजन

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । जिल्हा परिषद, जळगाव यांचे आदेशानुसार पाचोरा पंचायत समिती आयोजित दिनांक १७ व १८ डिसेंबर रोजी दोन दिवसीय क्रिकेट, हॉलिबॉल, खो – खो, कबड्डी, बॅडमिंटन अशा मैदानी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले आहे.

या स्पर्धा गटविकास अधिकारी अतुल पाटील, गटशिक्षणाधिकारी एन. एफ. चौधरी, सहायक गटविकास अधिकारी एम. एस. भालेराव, संजय देवकर, अमोल पाटील,आर. एस. बागुल, विस्तार अधिकारी दिलीप सुरवाडे, राजकुमार धस, सुनील पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली घेण्यात येणार आहेत. पाचोरा महाविद्यालयाच्या मैदानावर शनिवारी व रविवारी घेण्यात येणाऱ्या विविध हिवाळी स्पर्धांचे उद्घाटन गटविकास अधिकारी अतुल पाटील यांच्या हस्ते होणार असून यात क्रिकेट साठी १० संघ, कबड्डी स्पर्धेत ३ संघ, खो – खो साठी २१ खेळाडू, बॅडमिंटन स्पर्धेत ३१ खेळाडू, हॉलीबॉल साठी दोन संघ सहभागी झाले आहेत. विजयी खेळाडू व टिमला एक ते तीन क्रमांक देऊन सिड्स देवून गौरव करण्यात येणार आहे.

Exit mobile version