पाचोऱ्यात दिव्यांग बांधवांसाठी मोफत पुर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन

पाचोरा-लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी ।  भारत सरकार सामाजिक न्याय व अधिकारिता मंत्रालय यांच्या मार्फत पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या संकल्पनेतून दिव्यांग बांधवांना आत्मनिर्भर बनविण्यासाठी जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांच्या प्रयत्नातून पाचोरा ग्रामीण रुग्णालयात उद्या २४ फेब्रुवारी रोजी सकाळी ९ वाजेपासून ते दुपारी २ वाजेपर्यंत दिव्यांग बांधवांसाठी मोफत पुर्व तपासणी व नोंदणी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.

 

या शिबिरात दिव्यांग बांधवांनी नोंदणी करावयाची आहे. नोंदणी केलेल्या दिव्यांग बांधवांना ईडीपी योजने अंतर्गत कृत्रिम अवयव व सहाय्यभुत साधने वाटप केली जाणार आहे. शिबिरात येतांना नोंदणीसाठी दिव्यांग बांधवांनी दिव्यांगाचे प्रमाणपत्र, आधार कार्ड, रेशन कार्ड, उत्पन्नाचा दाखला अशी आवश्यक कागदपत्रे सोबत आणायची आहे.

 

अधिकृत नोंदणी झालेल्या दिव्यांगांना सहाय्यभुत साहित्य वाटपाची तारीख लवकरच कळविली जाईल. या मोफत पुर्व तपासणी व नोंदणी शिबिराचा परिसरातील जास्तीत जास्त दिव्यांग बांधवांनी लाभ घ्यावा असे आवाहन केंद्र सरकार योजना प्रचार व प्रसार विभागाचे प्रदेश संयोजक तथा जळगांव लोकसभा मतदारसंघाचे खासदार उन्मेष पाटील यांनी केले आहे.

Protected Content