Live Trends News | Jalgaon News, Jalgaon district Latest Breaking News In Marathi

पाचोऱ्यात दत्त पालखीची भव्य मिरवणूक

पाचोरा – लाईव्ह ट्रेंडस न्यूज प्रतिनिधी । शहरातील वाणी गल्ली, विठ्ठल मंदिर रोड येथील दत्त जयंती निमित्त दत्तांच्या मंदिरात आरती तसेच प्रसादाचा कार्यक्रम करीत सायंकाळी श्री. दत्तांच्या पालखीचे आयोजन करून भव्य अशी मिरवणूक जामनेर रोड, गांधी चौक, रथ गल्ली, आठवडे बाजार, रंगार गल्ली, विठ्ठल मंदिर रोड, अशी काढून मिरवणुकीत प्रचंड उत्साह व आनंद व्यक्त करण्यात आला.

यावेळी टाळ मृदुंगच्या गजरात दत्त महाराजांच्या जय घोषणेने परिसर दणदणला. यावेळी श्री. दत्तांच्या पालखीचे ठिकठिकाणी नागरिकांनी व महिलांनी पूजन करून श्री. दत्तांचे दर्शन घेतले. तसेच या परिसरातील सर्व नागरिक, सामाजिक कार्यकर्ते प्रतिष्ठित व्यापारी, समाज बांधव तसेच महिला वर्ग व बालगोपाल मंडळ उपस्थित होते. श्री. दत्तांच्या मंदिरात आरती करून व प्रसाद देऊन समारोप करण्यात आला. यावेळी श्री. दत्तांच्या आरती चे पूजन अण्णा भडजी यांनी केले. तसेच या श्री. दत्त मंदिराचे ट्रस्ट मंडळ यांनी नियोजन करून कार्यक्रमाची शोभा वाढवली.

याप्रसंगी दत्तात्रय सिनकर, रत्नाकर सिनकर, भरत सिनकर, प्रकाश सिनकर, मधुकर सिनकर, रमेश सिनकर, गणेश सिनकर, अजय सिनकर, अभिजीत सिनकर, विशाल सिनकर, स्वप्निल सिनकर, मयूर सिनकर, सागर सिनकर तसेच सिनकर परिवारातील सर्व सदस्य व महिला उपस्थित होत्या.

 

Exit mobile version